शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 11:30 IST

Neeraj Chopra IND vs PAK jawelin throw World Championship 2025: ऑलिम्पिक स्पर्धेनंतर पहिल्यांदा नीरज आणि अर्शद आमनेसामने

Neeraj Chopra IND vs PAK jawelin throw World Championship 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपच्या सामन्यामुळे रणकंदन माजले आहे. २२ एप्रिलला रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे आणि क्रीडाक्षेत्रातही याचे पडसाद उमटले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यास नकार दिल्याने मोठा वाद निर्माण झाला. त्याआधी भारताने पाकिस्तानशी खेळू नये, असा सूर दिसून आला होता. आता या सर्वांमध्ये, भारत आणि पाकिस्तान मधील आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा ऑलिंपिक चॅम्पियन अर्शद नदीम यांच्यात होणार आहे.

ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच आमनेसामने

गुरुवारी टोकियो येथील जपान नॅशनल स्टेडियमवर एक रोमांचक भालाफेक स्पर्धा होणार आहे. तिथे नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येतील. हा सामना आज, १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. दोन्ही खेळाडूंनी पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत ८४.५० मीटरपेक्षा जास्त फेक करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकनंतर दोघे मोठ्या स्पर्धेत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

नीरज की अर्शद... पात्रता फेरीत कोण ठरलं सरस?

पात्रता फेरीत नीरज चोप्राने आपली क्षमता उत्कृष्टपणे दाखवली. गट अ मध्ये, त्याने त्याच्या पहिल्याच फेकीत ८४.८५ मीटर अंतरापर्यंत भालाफेक केली आणि अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. गट ब मध्ये, अर्शद नदीमला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी संघर्ष करावा लागला. त्याचे पहिले दोन प्रयत्न निराशाजनक होते. त्यात तो ८० मीटरचा टप्पाही मोडू शकला नव्हता. पण तथापि, नदीमने त्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या फेकीमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि ८५.२८ मीटरची शानदार फेक केली.

अंतिम सामना कधी आणि कुठे?

नीरज चोप्रा आणि अर्शद नदीम यांनी आतापर्यंत १० आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. अर्शद नदीमने फक्त एकदाच नीरज चोप्राला हरवले आहे, पण तो सामना ऑलिम्पिकची फायनल होती. भालाफेक स्पर्धा टोकियोमधील जपान नॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. आज भारतीय वेळेनुसार, दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी हा सामना सुरू होईल.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्राIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तान