शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK : पाकिस्तानी खेळाडू भारतात आले पण, १४ मुंबईत अडकले; ६ जणंच बंगळुरूला पोहोचले अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:40 IST

IND vs PAK : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. हे दोन शेजारी जेव्हा खेळाच्या कोणत्याही मैदानावर समोरासमोर येतात तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते.

IND vs PAK : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. हे दोन शेजारी जेव्हा खेळाच्या कोणत्याही मैदानावर समोरासमोर येतात तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात येणार आहे. त्याआधी पाकिस्तानचा फुटबॉल संघ मुंबईत दाखला झाला, परंतु तेथेची त्यांची गफलत झाली. भारत-पाकिस्तान यांच्यात आज बंगळुरू येथे सायंकाळी ७.३० वाजता फुटबॉल लढत होणार आहे, परंतु पाकिस्तानचे १४ खेळाडू मुंबईत अडकले. फक्त ६ खेळाडूच बंगळुरूला पोहोचले आहेत.

पाकिस्तान फुटबॉल संघाला २०२३च्या SAFF अजिंक्यपद स्पर्धेसाठी तयारी मिळणार नाही. पण, १४ खेळाडूंची मुंबई ते बंगळुरू ही फ्लाईट मिस झाली अन् फक्त ६ खेळाडूच बंगळुरूला पोहोचलेय. त्यामुळे आजचा सामना वेळेत होईल की नाही, याबाबत शंकाच आहे. आधीच व्हिसा वेळेत मान्य न झाल्याने पाकिस्तानचा संघ SAFF अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतात उशीरा दाखल झाला. त्यात हा गोंधळ झाला. मंगळवारी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्याचा व्हिसा मॉरिशियस  येथे मिळाला. त्यांनी मध्यरात्री १.३० वाजता मॉरिशियसवरून मुंबईला येणारे विमान पकडले आणि मंगळारी ते बंगळुरूला दाखल होणार होते. पण, १४ खेळाडूंचं मुंबईवरून बंगळुरूला जाणारं विमान चुकलं. आता त्यांनी सामन्याची तारीख बदलण्याची विनंती केली आहे.   

आजपासून बंगळुरू येथील कांतिरावा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्या लढतीने SAFF Championship  स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अ गटात भारतासह पाकिस्तान, नेपाळ आणि कुवैत यांचा, तर ब गटात  लेबानन, मालदिव, भुटान व बांगलादेश यांचा समावेश आहे.  ४ जुलैपर्यंत ही स्पर्धा होणार आहे.   

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानFootballफुटबॉल