पैठण फेस्टिव्हलमध्ये क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
By admin | Updated: September 2, 2014 20:10 IST
पैठण : सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच पैठण फेस्टिव्हलमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करून स्थानिक खेळाडूंना वाव देण्याचा हेतू आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षा आ. संजय वाघचौरे यांनी पैठण फेस्टिव्हलमध्ये आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करताना व्यक्त केली.
पैठण फेस्टिव्हलमध्ये क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
पैठण : सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच पैठण फेस्टिव्हलमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करून स्थानिक खेळाडूंना वाव देण्याचा हेतू आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार होतील, अशी अपेक्षा आ. संजय वाघचौरे यांनी पैठण फेस्टिव्हलमध्ये आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करताना व्यक्त केली.येथील अभिनंदन मंगल कार्यालयात स्पर्धेचे उद्घाटन आज आ. संजय वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू बाजीराव गोरे, रामनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती होती. स्पर्धेत तालुक्यातील १५ शाळांतील ४८ संघांनी भाग घेतला. विजयी संघास ७,००० व उपविजयी संघास ३,००० रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. दोन दिवस स्पर्धा चालणार असून, पंचांची भूमिका लक्ष्मण सपकाळ, कैलास वाघमारे, अप्पासाहेब लघाने, बालासाहेब झारगड, नागे, वडेकर बजावीत आहेत.स्पर्धेत कौशल्या विद्यामंदिर पाटेगाव, भीमाशंकर विद्यालय वाहेगाव, आर्य चाणक्य पैठण, श्रीनाथ विद्यालय पैठण, जि.प. प्रशाला आडूळ व वडवाळी, भागीरथी विद्यालय वडवाळी, स्कॉलर पैठण, मोहटादेवी विद्यालय म्हारोळा, आयकॉन इंग्लिश स्कूल, संदीपान विद्यालय शेकटा, मारुती पाटील विद्यालय धूपखेडा, शालिवाहन विद्यालय पैठण, मानसिंग विद्यालय पारुंडी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी आश्रमशाळा पिंपळवाडी या शाळांनी भाग घेतला आहे.याप्रसंगी भिकाजी आठवले, भाऊसाहेब पिसे, अप्पासाहेब गायकवाड, कल्याण भुकेले, शहादेव लोहारे, संजय सोनारे, संतोष गव्हाणे, नीलेश गायकवाड, नाना पातकल, गणेश भाकरे, कांता भोसले, सागर जायभाये उपस्थित होते.