शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

न्यायालयीन क्रिकेट स्पर्धेचे थाटात उद्घाटन

By admin | Updated: January 24, 2016 22:19 IST

जळगाव : जिल्हा न्यायालयीन क्रीडा व कल्याण संघटना आणि जिल्हा न्यायालयीन कर्मचारी गट क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा व कला महोत्सव २०१६ अंतर्गत राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि क्रीडा चषकाचे उद्घाटन औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए. ...


जळगाव : जिल्हा न्यायालयीन क्रीडा व कल्याण संघटना आणि जिल्हा न्यायालयीन कर्मचारी गट क संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा व कला महोत्सव २०१६ अंतर्गत राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि क्रीडा चषकाचे उद्घाटन औरंगाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला यांच्याहस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.ए. लव्हेकर होते. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते. न्या. गंगापूरवाला यांच्याहस्ते प्रत्यक्ष फलंदाजी करुन व न्या. लव्हेकर यांनी गोलंदाजी करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. न्यायाधीश वृंद व वकील वृंद यांच्यामध्ये उद्घाटनपर सामना झाला. हा सामना न्यायाधीश वृंदाने जिंकला. त्यामध्ये जामनेर दिवाणी न्यायाधीश पठाण हे सामनावीर ठरले.
त्यानंतर राज्यातून आलेल्या संघांचे ९ सामने झाले.

सामने व विजयी संघ असे...
-अहमदनगर वि. अकोला- अकोला जिल्हा न्यायालय विजयी.
-उस्मानाबाद वि. बीड - बीड जिल्हा न्यायालय विजयी, सामनावीर- आर.बी. अन्सारी.
- अमरावती वि. बुलडाणा- बुलडाणा जिल्हा न्यायालय विजयी, सामनावीर- प्रदीप शिंदे.
- अमळनेर वि. बुलडाणा- अमळनेर विजयी, सामनावीर- मनोहर सोनार.
- जळगाव जिल्हा न्यायालय वि. भंडारा- जळगाव जिल्हा न्यायालय विजयी, सामनावीर- विनोद माचरे.
- औरंगाबाद उच्च न्यायालय वि. मुंबई स्मॉल कॉज- औरंगाबाद उच्च न्यायालय विजयी.

- सोलापूर वि. औरंगाबाद- औरंगाबाद जिल्हा न्यायालय विजयी.
- भुसावळ वि. बीड- बीड जिल्हा न्यायालय विजयी, सामनावीर- नवाजू अन्सारी

या वेळी प्रशांत महाजन, विलास भालेराव, प्रमोद नगरकर, विजय भारंबे, भोगरे, नीलेश सूर्यवंशी, मनीष जैन उपस्थित होते.