मुंबई : आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणाची चौकशी करणा:या न्या. मुकुंद मुद्गल समितीच्या अहवालातील खेळाडूंची नावे उघड होऊ नये, म्हणून न्यायालयाने यथायोग्य काळजी घेतली; परंतु कामकाजादरम्यान अनवधानाने तीन खेळाडूंच्या नावाचा उल्लेख न्यायाधीशांनी केल्याने या सुनावणीला नाटय़मय वळण मिळाले. नंतर न्यायालयाने या खेळाडूंची नावे प्रसिद्ध करू नयेत, असे आदेश दिले; पण तत्पूर्वी काही वृत्तवाहिन्यांवर ही नावे झळकलीसुद्धा. नंतर ही बातमी थांबविण्यात आलीे.
आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणाचा बहुप्रतीक्षित चौकशी अहवाल आज न्यायालयात उघड होणार असल्याने त्यात कोणाची नावे येतात, याची सर्वत्र उत्सुकता होती. सुनावणीदरम्यान न्यायालयाने यात सहभागी असणा:या चार गैरखेळाडूंची नावे वाचून दाखविली. यांमध्ये आयसीसी चेअरमन एन. श्रीनिवासन, त्यांचा जावई आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा टीम प्रिन्सिपाल गुरुनाथ मय्यपन, आयपीएल सीईओ सुंदर रमण आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांचा समावेश होता. पण, या चौघांची नावे कोणत्या संबंधाने या अहवालात आली आहेत, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. या सर्वाचा उल्लेख न्यायालयाने ‘नाटय़ातील सहभागी कलाकार’ असा केला. पण, मुद्गल समितीने काढलेल्या निष्कर्षावर सविस्तर युक्तिवाद झाल्यानंतरच निर्णय देण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या अहवालातील निष्कर्ष हे ज्यांचे वर्तन संशयास्पद आहे अशा लोकांची चौकशी करून नोंदविले आहेत असे दिसून येते, असे मत न्यायालयाने नोंदविले.
या अहवालाची प्रत बीसीसीआय आणि वरील निर्देशित चार लोकांना देण्यात यावी; पण त्यांतील खेळाडूंच्या नावाचा उल्लेख असलेला भाग खोडावा, असे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने या चौघांना आपली हरकत चार दिवसांत दाखल करण्यासही सांगितले. 2क् नोव्हेंबर रोजी होणारी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) पुढे ढकलण्याबाबत न्यायालयाने स्पष्टपणो कोणताही निर्णय दिला नाही. हा निर्णय बीसीसीआयने घ्यावा, असे सांगितले. पण, काही प्रसारमाध्यमांनी न्यायालयाने एजीएम पुढे ढकलण्याचा आदेश दिला, असे चुकीचे वृत्त दिले. नंतर बीसीसीआयने एजीएम जानेवारी 2क्15 र्पयत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. (क्रीडा प्रतिनिधी)
माझी सर्व राज्य संघटनांना विनंती आहे, की त्यांनी आता जागे व्हावे. आज सात नावे उघड झाली आहेत. पाच मोठय़ा खेळाडूंची नावे मागे ठेवण्यात आली आहेत. न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणो मी ही तीन नावे उघड करणार नाही. तीनपैकी दोन खेळाडू चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळत होते इतकेच मी सांगू शकतो. श्रीनिवासन, मयप्पन, सुंदर रमण आणि कुंद्रा यांच्या विरोधात खटला चालविण्यात यावा, यासाठी वकील हरीश साळवे हे अर्ज दाखल करणार आहेत. असे आदित्य वर्मा म्हणाल़े
2:3क् - मुद्गल समितीच्या अहवालात एन o्रीनिवासन, आयपीएल सीओओ सुंदर रमन , गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांची नाव समोर आली
2:47 - सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला निवडणुक थांबविण्याचा निर्देश दिले. तसेच राज कुंद्रा आणि गुरूनाथ मपयप्पन यांच्या वकिलांना मुद्गल समितीची अहवाल देण्यास सांगितले.
2:5क् - या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 नोव्हेंबरला घेणार असल्याचे सांगितले
3:क्क् - बीसीसीआय, आयसीसीचे प्रमुख आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन o्रीनिवासन आणि इतरांना आजच्या निर्णयावर हरकत घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने चार दिवसांची मुदत दिली आहे. तसेच बीसीसीआय आणि o्रीनिवासन यांना अहवाल देण्याचे निर्देश दिले.
3:क्5 - आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचा न्यायमुर्ती मुकूल मुद्गल यांनी स्पष्ट केले.
3:1क् - अहवालात समावेश असलेल्या व्यक्तिंना 24 नोव्हेंबरच्या सुनावणी दरम्यान हजर राहण्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले. शुक्रवारी अनावधानाने न्यायालयाने तिन क्रिकेटपटूंची नावे जाहीर केली असली तरी सहा जणांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहेत. या प्रकरणात बीसीसीआयचे नाव येणो ही लाजीरवाणी बाब असून o्रीनिवासन यांना पद खुर्चीचा मोह आवरत नाही. ते कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही. 24 तारखेला आणखी खेळाडूंची नावे समोर येतील, असे याचिकाकर्ता आदित्य वर्मा यांनी सांगितले.
3:15 - न्यायालय योग्य दिशेने कारवाई करत असून त्यावर कोणतेही भाष्य करणो उचित ठरणार नाही. समितीनेही सर्व बाजुनी अभ्यास करून अहवाल मांडला असल्याचे, मुद्गल यांनी सांगितले.