शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

ऑलिम्पिक पुन्हा स्थगित करणे अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 02:20 IST

आधीच वर्षभर लांबणीवर टाकण्यात आलेले ऑलिम्पिक आयोजन २३ जुलै २०२१ च्या पुढे वाढविणे अशक्य असल्याचे त्यांचे मत आहे.

टोकियो : टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी कोरोनामुळे पुन्हा एकदा आयोजन स्थगित करणे जवळपास अशक्य असल्याचे गुरुवारी सांगितले. आधीच वर्षभर लांबणीवर टाकण्यात आलेले ऑलिम्पिक आयोजन २३ जुलै २०२१ च्या पुढे वाढविणे अशक्य असल्याचे त्यांचे मत आहे.मोरी म्हणाले, ‘क्रीडा व्यवस्थापन, खेळाडू आणि आयोजनाशी जुळलेल्या अन्य सर्व बाबींचा विचार व्हायला हवा. दोन वर्षांसाठी आॅलिम्पिक लांबणीवर टाकणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. आॅलिम्पिक आयोजन दोन वर्षांसाठी लांबणीवर टाकायचे का, अशी विचारणा मी याआधीच पंतप्रधान शिंजो आबे यांच्याकडे केली होती, मात्र त्यांनीही केवळ वर्षभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.’कोरोना व्हायरसवर मानवाने मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून टोकियो आॅलिम्पिककडे पाहिले जाईल. तथापि वर्षभरानंतर खरोखर आॅलिम्पिकचे आयोजन होऊ शकेल का, असा प्रश्न आता विचारला जात आहे. कोबे विद्यापीठाच्या संक्रमण रोगाचे प्राध्यापक केतारो इवाता यांनी याच आठवड्यात कोरोना व्हायरसवर विजय मिळविणे कठीण होत चालल्याची चिंता व्यक्त करीत प्रामाणिकपणे बोलायचे तर टोकियो आॅलिम्पिक पुढील वर्षीदेखील होऊ शकेल का, याबद्दल माझ्या मनात शंका असल्याचे वक्तव्य केले होते. (वृत्तसंस्था)कोरोनामुळे समस्येत पडली भरआयोजकांसाठी कोरोनाचा प्रकोप सतत अडसर ठरत आहे. स्पर्धा वर्षभर लांबणीवर पडल्यानंतरही कोरोनामुळे आयोजनात व्यत्यय येत आहे. स्टाफमधील एक सदस्य बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या सदस्याला क्वारंटाइन करण्यात आले आहे. हारुमी नावाची ही व्यक्ती टोकियो आॅलिम्पिकच्या मुख्यालयात कार्यरत होती. तिच्यासोबत जितके जण कामावर होते त्या सर्वांना घरीच सुरक्षित राहण्यास सांगण्यात आले. समितीत जवळपास ३५०० कर्मचारी काम करीत असून त्यापैकी ९० टक्केलोकांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.लस नाही तर आॅलिम्पिक नाही...जागतिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत कोविड-१९ वर लस तयार होत नाही तोपर्यंत टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन होणे शक्य नाही. आॅलिम्पिकचे आयोजन २०२१ ला व्हायचे असेल तर त्याआधी लसचा शोध लागणे आवश्यक असल्याचे मत प्रा. देवी श्रीधर यांनी व्यक्त केले. लसचा शोध लवकरच लागेल, असा आशावाद व्यक्त करीत बीबीसीशी बोलताना श्रीधर पुढे म्हणाले, ‘लस शोधणे शक्य असल्याचे तज्ज्ञांकडून आम्ही ऐकले आहे. यासाठी वर्ष-दीड वर्ष लागेल, असा माझा अंदाज होता, तथापि लसचा शोध लवकर लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आम्ही पुढच्या वर्षीपर्यंत टीकाकरण करू शकलो तर आॅलिम्पिकचे आयोजन होईलच.’ ही लस प्रभावी ठरेल आणि स्वस्त दरात उपलब्ध झाल्यास आपण त्याला ‘गेम चेंजर’ म्हणू शकू. तज्ज्ञांना यश न आल्यास आॅलिम्पिकचे आयोजन कठीण होईल, असे मत श्रीधर यांनी मांडले.

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020