शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलाचा वाढदिवस करून घरी परतणाऱ्यांवर काळाचा घाला; नाशिक इथं अपघातात ७ नातेवाईकांचा मृत्यू
2
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
3
बांगलादेशात सुरक्षा दल अन् शेख हसीना समर्थकांमध्ये संघर्ष, चार जणांचा मृत्यू
4
"मला काही झाले, तर असीम मुनीरच जबाबदार"; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कसली भीती वाटतेय?
5
कोहलीला तोड नाही! टी-२० सह कसोटीतून निवृत्ती; तरीही तो ठरला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील 'किंग'
6
१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा
7
'मी १००० तरुणींसोबत रिलेशनशिपमध्ये होतो, पण आता मला...'; ३१ वर्षीय तरुण का आहे चर्चेत?
8
१.१७ कोटी आधार कार्ड झाली बंद; 'अशा' लोकांचं आधार कार्ड निष्क्रिय करतंय UIDAI, पाहा डिटेल्स
9
NEET परीक्षेत अपयशी ठरली, मग UPSC ची तयारीही सोडली: आता ७२ लाखांचं पॅकेज घेणारी युवती आहे कोण?
10
मुंबईत ४० लाखांचा पगारही कमी? 'या' आयटी तरुणाची कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
11
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
12
धर्मांतरानंतर गायब झाल्या हिंदू मुली, छांगुर बाबाच्या आणखी एका चेल्याची पोलखोल; मेरठशीही थेट कनेक्शन!
13
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
14
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
15
विशीतल्या हिरोसोबत रोमान्स करणार करीना कपूर, आगामी सिनेमात साकारणार भूताची भूमिका
16
Stock Market Today: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात; निफ्टी २५,२०० च्या वर, SBI, Hindalco, Eicher Motors मध्ये खरेदी
17
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
18
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
19
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
20
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका

बीसीसीआयची महत्त्वाची बैठक आज

By admin | Updated: February 8, 2015 02:01 IST

(बीसीसीआय) बहुप्रतीक्षित वार्षिक बैठकीची (एजीएम) तारीख निश्चित करण्यासाठी रविवारी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

चेन्नई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बहुप्रतीक्षित वार्षिक बैठकीची (एजीएम) तारीख निश्चित करण्यासाठी रविवारी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. आयपीएलच्या सहाव्या पर्वातील भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर २२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर बीसीसीआय कार्यकारिणीची प्रथमच बैठक होत आहे. न्यायालयाने दुटप्पी भूमिकेचा उल्लेख करताना एन. श्रीनिवासन यांना बोर्ड किंवा आयपीएल फ्रॅन्चायझीमधील भागीदारी याबाबत एकाची निवडीचे निर्देश दिले होते.सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन यांचे मालकी हक्क असलेल्या इंडिया सिमेंट्सने आयपीएल संघ चेन्नई सुपरकिंग्जमधील आपली भागीदारी रद्द करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची पुन्हा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा होईल. श्रीनिवासनच्या कंपनीने बीएसईला याबाबत माहिती दिली आहे. संचालक मंडळाच्या सदस्यांची ११ फेब्रुवारी रोजी बैठक होणार असून, त्यात सीएसके क्रिकेट लिमिटेडचे पुनर्गठन करण्यावर चर्चा होणार आहे. कंपनीने आयपीएल फ्रॅन्चायझीला पूर्ण नवी सहायक कंपनी सीएसके क्रिकेट लिमिटेडला स्थानांतरित करण्यासाठी कागदी कारवाई पूर्ण केली आहे. (वृत्तसंस्था)बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘बोर्डाच्या कार्यकारी समिती बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशींवर चर्चा होणार आहे. तसेच बैठकीमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ मार्च किंवा त्यापूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत.