नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे आव्हान कठीण असले, तरी मी माझी सर्वोत्तम कामगिरी करेल. रिओसाठी जगभरातील जिमनॅस्टिक्सचा सामना करण्यास मी सज्ज आहे, असा विश्वास आॅलिम्पिकमध्ये ५२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताकडून पात्र ठरलेल्या एकमेव जिमनॅस्ट दीपा करमाकर हिने व्यक्त केला. रिओसाठी भारतीय संघात एकमेव जिमनॅस्ट असलेल्या दीपा हिने सांगितले की, ‘‘ज्यावेळी मी खेळाला सुरुवात केली तेव्हा प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांना शाश्वती नव्हती. मला त्यांनी पायांचे तळवे चपटे असल्याने जिमनॅस्टिक तुझ्याकडून होणार नाही, असे सांगितले होते.’’‘‘माझी एकाग्रता आणि मेहनत यावर माझे प्रशिक्षक प्रभावित झाले. जर सर्वश्रेष्ठ प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावयाचा असेल तर आम्हाला धोका पत्करावाच लागेल,’’ असेही दीपा हिने यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)>माझ्यासाठी रिओ आॅलिम्पिक खूप मोठी स्पर्धा असून, यामध्ये मी देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे ही खूप सन्मानाची बाब आहे. माझ्याकडे या स्पर्धेत गमाविण्यासारखे काहीच नसले तरी इतर कोणत्याही खेळाडूसह माझी तुलना करणे योग्य नाही. - दीपा करमाकर >आमच्याकडे सुरुवातीला काहीच साहित्य नव्हते. त्यात दीपा हिच्या एकूण स्थितीकडे पाहून मी घाबरलो होतो. मात्र, ती निडरपणे सराव करीत होती. तिच्या या बेधडक कामगिरीमुळेच आज आपल्याला यशाचे फळ मिळाले आहे. ती नक्कीच शानदार कामगिरीच्या जोरावर पदक जिंकण्यात यशस्वी ठरेल. - विश्वेश्वर नंदी, प्रशिक्षक
आॅलिम्पिकसाठी मी पूर्णपणे सज्ज
By admin | Updated: July 23, 2016 05:25 IST