शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

फायदा होत असेल, तर स्लेजिंग करणारच!

By admin | Updated: February 15, 2017 00:40 IST

माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्या मनाप्रमाणेच खेळ करेल. जर तो स्लेजिंग सारखे प्रकार करीत असेल आणि त्याचा फायदा संघाला होत असेल, तर

मुंबई : माझ्या संघातील प्रत्येक खेळाडू त्याच्या मनाप्रमाणेच खेळ करेल. जर तो स्लेजिंग सारखे प्रकार करीत असेल आणि त्याचा फायदा संघाला होत असेल, तर मी त्या खेळाडूला रोखणार नाही,’ असे स्पष्ट मत व्यक्त करताना आॅस्टे्रलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने भारतीय संघाला एकप्रकारे इशाराच दिला. विशेष म्हणजे, कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाचे शिलेदारही ‘जसास तसे’ उत्तर देण्यात तरबेज असल्याने या मालिकेत क्रिकेटप्रेमींना मोठी मेजवानी मिळणार असल्याचे स्पष्ट आहे.क्रिकेटविश्वात स्लेजिंगद्वारे प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकर करण्यासाठी प्रसिध्द असलेले आॅस्टे्रलियन्स भारत दौऱ्यावरही आपल्या या रणनितीसह खेळणार असल्याचे स्मिथने बोलून दाखवले. दखल घेण्याची बाब म्हणजे, भारत - आॅस्टे्रलियादरम्यान स्लेजिंगचे अनेक किस्से क्रिकेटविश्वात प्रसिध्द असून यातील हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंड्स यांच्यातील ‘मंकीगेट’ प्रकरण सर्वाधिक गाजले होते. भारत दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगताना स्मिथ म्हणाला की, ‘भारतात विजय मिळवणे संघातील खेळाडूंसाठी आयुष्यातील सर्वाधिक सुखद क्षण असेल. भारतात खेळणे अत्यंत आव्हानात्मक आहे. जर आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरलो, तर १०-२० वर्षांनी या यशाकडे आम्ही आयुष्यातील सर्वात सुखद क्षण म्हणून बघू. भारतात खेळण्याची ही शानदार संधी आहे. हा दौरा अत्यंत कठीण ठरेल आणि मी आव्हानाला सामोरे जाण्यास उत्सुक आहे,’ असेही स्मिथने सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)विराट कोहलीविरुद्ध आम्ही रणनिती आखली असून त्याबाबत सहाजिकच काही बोलणार नाही. तो जागतिक दर्जाचा खेळाडू असून चांगली फलंदाजी करीत आहे. त्याने मागील चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावले आहे. भारताचे अव्वल सहा फलंदाज खूप मजबूत असून त्यांना रोखण्यात आम्ही यशस्वी होऊ अशी अपेक्षा आहे. - स्टिव्ह स्मिथ, कर्णधार - ऑस्ट्रेलियाआमची तयारी चांगली झाली आहे. हा दौरा खूप रोमांचक होईल. भारतीय संघ खूप चांगला असून त्यांच्याकडे अनेक चांगले वेगवान व फिरकी गोलंदाज आहेत. त्यांनी स्वदेशामध्ये गेल्या २० कसोटींपैकी एकही कसोटी गमावलेली नाही आणि त्यांचा संघ खूप मजबूत असल्याची आम्हाला कल्पना आहे. - डॅरेन लेहमन, प्रशिक्षक - ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलियाने २००४-०५ साली भारताला २-१ असे नमवल्यानंतर भारतीय भूमीवर एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. ब्रेबॉर्न स्टेडियमवर १६ - १८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तीनदिवसीय सराव सामन्याद्वारे आॅस्टे्रलिया संघ भारतीय दौऱ्याची सुरुवात करेल. च्२०१२ साली इंग्लंडकडून घरच्या मैदानावर मालिका गमावल्यानंतर भारताने आपल्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही. भारताने दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध सहज वर्चस्व राखले.