शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आयसीसी चेअरमनपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार : मनोहर

By admin | Updated: May 11, 2017 00:40 IST

जून २०१८पर्यंत मी पदावर कायम राहणार, हे शशांक मनोहर यांनीच स्पष्ट केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी)

नवी दिल्ली : जून २०१८पर्यंत मी पदावर कायम राहणार, हे शशांक मनोहर यांनीच स्पष्ट केल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) चेअरमनपदाचा कार्यकाळ ते पूर्ण करणार का, याबद्दलची अनिश्चितता आता संपुष्टात आली आहे. आयसीसीचे स्वतंत्र चेअरमन म्हणून शशांक मनोहर हे जून २०१८पर्यंत पदावर कायम राहतील, असे बुधवारी आयसीसीच्या वतीने सांगण्यात आले. मागच्या वर्षी मार्च महिन्यात मनोहर यांनी वैयक्तिक कारण पुढे करीत राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. तथापि, आयसीसीच्या पूर्णकालीन तसेच सहयोगी सदस्यांनी त्यांना कार्यकाळ पूर्ण करण्याची विनंती केली होती. ‘ईएसपीएन-क्रिकइन्फो’ने दिलेल्या वृत्तानुसार मनोहर यांनी आयसीसीत नव्या सुधारणा लागू करण्यास पुढाकार घेतला. या सुधारणा पूर्णपणे अमलात येईपर्यंत पदावर कायम राहण्याचा सदस्यांनी त्यांच्याकडे आग्रह धरला होता. सुरुवातीला मनोहर हे यंदा जूनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक आमसभेपर्यंतच पदावर राहणार होते. तथापि, कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी त्यांचे मन वळविण्यात आले आहे. मूळ नागपूरचे निष्णात वकील असलेले माजी बीसीसीआय अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर यांनी आयसीसीत लाभांशवाटप तसेच कार्यसंचालनाचे नवे मॉडेल आणले आहे. सदस्यांनी त्यांच्या कार्याला भक्कम पाठिंबा दर्शविला. दुबईत आयसीसी बैठकीदरम्यान यावर मतदान घेण्यात आले, तेव्हा बीसीसीआयला लाभांश मॉडेलवर १-१३ आणि संचालन मॉडेलवर १-१२ अशा मोठा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला होता. लाभांश तसेच संचालन मॉडेलला केवळ बीसीसीआयने विरोध दर्शविला. त्यामुळे विश्व क्रिकेटमध्ये सध्या बीसीसीआय एकाकी पडले आहे. मनोहर यांच्यामुळेच जगातील सर्वांत श्रीमंत क्रीडा संस्था असलेल्या बीसीसीआयला आर्थिक नुकसान झाल्याचे बीसीसीआय अधिकाऱ्यांचे मत आहे. बीसीसीआय प्रशासकांच्या समितीनुसार (सीओए) बीसीसीआयच्या चिंतेचे मोठे कारण लाभांश मॉडेल नसून, संचालन मॉडेल हेच आहे. दुसरीकडे, मनोहर आपला कार्यकाळ पूर्ण करणार असल्याने ईसीबी अध्यक्ष जाईल्स क्लार्क यांच्या आशेवर पाणी पडले आहे. जाईल्स हे आयसीसीचे स्वतंत्र चेअरमन होण्यास इच्छुक होते. (वृत्तसंस्था)