शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खेळाचा चांगला दर्जा अनुभवायला मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 04:04 IST

मी जेव्हा खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धाचे प्रसारण बघते त्यावेळी एक गोष्ट चांगली वाटते ती प्रसारणाची शानदार गुणवत्ता.

- अंजू बॉबी जॉर्ज लिहितात...मी जेव्हा खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धाचे प्रसारण बघते त्यावेळी एक गोष्ट चांगली वाटते ती प्रसारणाची शानदार गुणवत्ता. मला आठवते की, २००४ च्या अथेन्स आॅलिम्पिकमध्ये लांब उडी स्पर्धेचे रेकॉर्डिंग मला बघता आले नव्हते. सध्या खेळाडूंना उच्च दर्जाचे रिप्ले बघता येतात. अनेक क्लीप्स सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत.मला विश्वास आहे की, खेलो इंडिया कार्यक्रम शानदार आहे. ही स्पर्धा आता विद्यापीठ पातळीवर पोहचणे आणखी शानदार आहे. गुणवत्ता पुढे येण्यासाठी आता अनेक संधी निर्माण झाल्या असून हे आवश्यक होते. खेलो इंडिया स्पर्धेच्या माध्यमातून खेळाचा चांगला दर्जा अनुभवायला मिळत आहे. भविष्यात त्याचा लाभ भारताला नक्कीच मिळेल.प्रदीर्घ कालावधीपासून आपल्याकडे असे खेळाडू आहेत की ज्यांनी ज्युनिअर पातळीवर शानदार कामगिरी केली. पण सिनियर पातळीचा विचार करता ते कुठे गडप झाले, हे कळलेच नाही. खेलो इंडिया विद्यापीठ गेम्समध्ये खेळाडू, प्रशिक्षक, शारीरिक शिक्षण विभाग व विद्यापीठांनाही या पातळीवर आपली छाप सोडण्याची संधी मिळेल. त्यासाठी कदाचित वेळ लागेल. पण अमेरिकेप्रमाणे महाविद्यालयीन स्पर्धांतून चॅम्पियन पुढे येताना बघणे सुखावणारे राहील, जर विद्यापीठ पातळीवर क्रीडा गुणवत्तेचे पैलू पाडता आले आणि युवा खेळाडूंना योग्यवेळी योग्य वातावरण व योग्य दिशा मिळाली तर देशातील क्रीडा वर्तुळाला मोठा लाभ होईल.दरम्यान, द्रोणाचार्य जे. एस. सैनी यांच्या निधनाचे वृत्त ऐकले त्यावेळी विद्यापीठाचे प्रशिक्षक खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी मदत करू शकतात, हे सांगणे कठीण वाटते. खेलो इंडिया विद्यापीठ गेम्सच्या सुरुवातीमुळे प्रशिक्षकांना खेळाडूंची गुणवत्ता शोधून जगापुढे ओळख निर्माण करून देण्याची अतिरिक्त संधी मिळाली आहे.खेळाडूंनी केवळ आपल्या स्पर्धेतच नाही, तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विजय मिळविण्याच्या निर्धाराने मैदानात उतरावे. या उद्देशाने शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ प्रयत्न करतील, अशी आशा आहे. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा युवा खेळाडूंना त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या शिक्षण संस्थांनाही मदत करतील, अशी मला आशा आहे. मी खेलो इंडिया विद्यापीठ गेम्सच्या उपयोगितेबाबत अनेक टिपणी ऐकल्या आहेत. पण या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक खेळ प्रकाशझोतात आल्याचे मी अनुभवले आहे.