शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

आरसीबीपुढे हैदराबादचे आव्हान

By admin | Updated: April 25, 2017 01:06 IST

गेल्या लढतीत ४९ धावांत गारद झाल्याच्या धक्क्यातून सावरण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आज

बंगळुरू : गेल्या लढतीत ४९ धावांत गारद झाल्याच्या धक्क्यातून सावरण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला आज, मंगळवारी गत चॅम्पियन सनरायजर्स हैदराबादच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. गेल्या लढतीत आयपीएलच्या इतिहासात नीचांकी धावसंख्येवर गारद होणाऱ्या विराट अँड कंपनीसाठी हे आव्हान सोपे नाही. सात सामन्यांत केवळ चार अंकांची कमाई करणारा आरसीबी संघ गुणतालिकेत सर्वांत तळाच्या स्थानावर आहे. त्यामुळे आता त्यांच्यासाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती आहे. केदार जाधवने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना चमकदार कामगिरी केली आहे. भेदक वेगवान माऱ्यापुढे त्याचे तंत्र साधारण ठरले. कोहलीला संघसहकाऱ्यांकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे.सुमार फलंदाजी, अशी प्रतिक्रिया त्याने दिली होती. बाद फेरीपूर्वीच आरसीबीला गाशा गुंडाळावा लागणे भारतीय कर्णधाराला पचनी पडणे अवघड आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता सनरायझर्सच्या खात्यावर ८ गुणांची नोंद असून, हा संघ विजयी मार्गावर परतण्यास प्रयत्नशील आहे. त्यांनी सलग चार विजय मिळवले होते, पण गेल्या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंटविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. (वृत्तसंस्था)