मेलबर्न : एका भारतीय सट्टेबाजाची भेट घेल्यामुळेच गोलंदाज अल अमीन हुसैनला बांगलादेश संघातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला, असा दावा बांगलादेशमधील माध्यमांनी केला आहे; मात्र उशिरापर्यंत हॉटेलबाहेर राहिल्यामुळे हुसैनवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण बांगलादेश क्रिकेट मंडळाने (बीसीबी) दिले आहे़बांगलादेश संघव्यवस्थापनाने रविवारी जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते, की हुसैन ठरवून दिलेल्या वेळेत हॉटेलमध्ये परतला नाही़ त्यामुळे हा प्रकार नियमांचे उल्लंघन करणारा होता़ म्हणून मंडळाने त्याच्यावर कारवाई केली; मात्र ढाक्यातील माध्यमांनी दावा केला, की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) भ्रष्टाचारविरोधी पथक गेल्या अनेक दिवसांपासून हुसैनवर नजर ठेवून होते़
सट्टेबाजांना भेटल्यामुळेच हुसैन टीममधून आउट?
By admin | Updated: February 25, 2015 01:25 IST