विशाल, रिद्धी, हर्षा, पुष्कर यांना विजेतेपद
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
सोलापूर: धर्मा चषक १५ वर्षांखालील निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत विशाल कल्याणशेी, रिद्धी उपासे, हर्षा इंदापुरे व पुष्कर पेशवे यांनी विविध वयोगटातून विजेतेपद पटकावले़
विशाल, रिद्धी, हर्षा, पुष्कर यांना विजेतेपद
सोलापूर: धर्मा चषक १५ वर्षांखालील निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत विशाल कल्याणशेी, रिद्धी उपासे, हर्षा इंदापुरे व पुष्कर पेशवे यांनी विविध वयोगटातून विजेतेपद पटकावले़या स्पर्धेत ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला़ या स्पर्धेचे बक्षीस वितरण धर्मा भोसले, सुनील मालप, हाजीमलंग नदाफ, सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे चेअरमन शरद नाईक, सचिव सुमुख गायकवाड, अनिल वाधमारे, सोपान थोरात आदींच्या उपस्थितीत झाले़पंच म्हणून उदय वगरे, प्रशांत पिसे, गणेश मस्कले, निहार कुलकर्णी, युवराज पोगूल यांनी काम पाहिले़ (क्रीडा प्रतिनिधी)स्पर्धेचा अंतिम निकाल असा-१३ वर्षांखालील वयोगट: विशाल कल्याणशेी (साडेचार गुण, साडेबावीस बोकोल्स गुण), साईराज इंदापुरे, मयूरेश मगदूम़११ वर्षांखालील वयोगट: रिद्धी उपासे (४,१९ गुण), रजण आडम, यश कुलकर्णी़९ वर्षांखालील वयोगट: हर्षा इंदापुरे (५,१४़५ गुण), आरोही पाटील, वैष्णवी येलदी़७ वर्षांखालील वयोगट: पुष्कर पेशवे (४, १५ गुण), समृद्धी मिठ्ठा, आरव बंब़फोटोओळी-धर्मा चषक निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंसोबत उदय वगरे, सुनील मालप, हाजीमलंग नदाफ, धर्मा भोसले, शरद नाईक, सुमुख गायकवाड, सोपान थोरात, अनिल वाघमारे़