शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
3
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
4
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
5
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
6
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
7
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
8
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
9
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
10
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
11
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
12
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
13
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
14
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
15
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
16
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
17
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
18
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
19
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
20
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई

कर न भरल्यामुळे होळकर स्टेडियमला टाळे ठोकले

By admin | Updated: March 30, 2017 22:37 IST

किंग्ज इलेव्हन पंजाबचे घरचे मैदान होळकर स्टेडियमला संपत्ती कर जमा न केल्यामुळे आज सील करण्यात आले आहे

ऑनलाइन लोकमतइंदूर, दि. 30 - आयपीएल सुरू होण्यास आता अवघा एक आठवडा बाकी आहे; परंतु किंग्ज इलेव्हन पंजाबचे घरचे मैदान होळकर स्टेडियमला संपत्ती कर जमा न केल्यामुळे आज सील करण्यात आले आहे. येथे 8 एप्रिल रोजी पहिला सामना होणार आहे.इंदूर महानगरपालिकने 29 लाख रुपयांपेक्षा जास्त संपत्ती कर आणि अन्य स्थानिक कर न भरल्यामुळे मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याचे कार्यालय व होळकर स्टेडियमच्या दोन मुख्य प्रवेशद्वार मध्य प्रदेश नगरपालिका अधिनियम 1956 नुसार गुरुवारी सील केले. विशेष म्हणजे पुढील महिन्यात याच स्टेडियमवर होणाऱ्या तीन आयपीएल सामन्यांआधी हे पाऊल उचलण्यात आले. महानगरपालिकेचे उपायुक्त प्रतापसिंह सोळंकी म्हणाले, ‘एमपीसीएवर आर्थिक वर्ष 2016-17 दरम्यानचे 29 लाख 9 हजार 605 रुपये संपत्ती कर आणि अन्य स्थानिक कर भरण्याचे बाकी होती. सोळंकी यांनी सांगितले की, ‘होळकर स्टेडियमच्या 1 लाख 61 हजार वर्गफूट परिसरात पसरलेल्या क्रिकेट मैदानाविषयी एमपीसीएकडून महानगरपालिकेच्या खात्यात संपत्ती कर जमा केला जात नसल्याचे महानगरपालिकेच्या पथकाला तपासादरम्यान आढळले होते.’दरम्यान, सीईओ रोहित पंडित यांनी म्हटले की, ‘एमपीसीए 2010-11 मध्ये सात लाख 40 हजार रुपये संपत्ती कर भरला आहे; परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अचानक चार दिवसआधी नवीन कर निर्धारण कराची रक्कम 29 लाख रुपयांपर्यंत पोहोचवली.’