शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

झारखंडचा ऐतिहासिक विजय

By admin | Updated: December 27, 2016 04:03 IST

फिरकी गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर युवा आक्रमक फलंदाज इशान किशनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर झारखंडने हरियाणाला ५ विकेट्सने नमवले. विशेष म्हणजे यासह झारखंडने

वडोदरा : फिरकी गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर युवा आक्रमक फलंदाज इशान किशनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर झारखंडने हरियाणाला ५ विकेट्सने नमवले. विशेष म्हणजे यासह झारखंडने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे भारताचा एकदिवसीय क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नजरेखाली झारखंडने ही कामगिरी केली आहे. पहिल्या डावात ८७ धावांची आघाडी घेतलेल्या झारखंडने हरियाणाचा दुसरा डाव २६२ धावांत गुंडाळला. यामुळे झारखंडला १७६ धावांचे लक्ष्य मिळाले. झारखंडने चौथ्याच दिवशी पाच फलंदाजांच्या मोबदल्यात निर्धारीत धावा काढताना दिमाखदार विजय मिळवला. याआधी २०१२-१३ मध्ये पंजाब आणि २०१५-१६ मध्ये मुंबईविरुद्ध झारखंडचे आव्हान उपांत्यपुर्व फेरीत संपुष्टात आले होते.युवा यष्टीरक्षक फलंदाज इशानने आक्रमक फटकेबाजी करताना ६१ चेंडूत ९ चौकार व ६ षटकारांची आतषबाजी मारताना ८६ धावांचा तडाखा दिला. इशानच्या या खेळीमुळे झारखंडने सहजपणे दिलेले आव्हान गाठले. त्याने आनंद सिंगसह ९५ धावांची दमदार सलामी देत संघाला मजबूत सुरुवात करुन दिली. इशान बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्य २ बाद १३९ अशी झाली होती. यानंतर, पहिल्या डावातील शतकवीर विराट सिंग (२१), इशांक जग्गी (८) आणि सुमित कुमार (१८) देखील बाद झाले. परंतु, तोपर्यंत झारखंडचा विजय अवाक्यात आला होता. हरियाणाकडून युजवेंद्र चहल आणि संजय पहल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तत्पूर्वी, २ बाद १४६ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केलेल्या हरियाणाने ठराविक अंतराने आपले फलंदाज गमावले. चैतन्य बिष्नोई याने ५२ धावांची झुंजार खेळी केली. तर, तळाच्या फळीतील संजय पहलने २९ आणि हर्षल पटेलने २५ धावा काढल्या. शाहबाज नदीम (४/७८) आणि समर कद्री (३/७५) यांनी हरियाणाला गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावली. संक्षिप्त धावफलकहरियाणा (पहिला डाव) : ९५.३ षटकात सर्वबाद २५८ धावा.झारखंड (पहिला डाव) : १२० षटकात सर्वबाद ३४५ धावा.हरियाणा (दुसरा डाव) : ९७.१ षटकात सर्वबाद २६२ धावा. (चैतन्य बिष्नोई ५२, शुभम रोहिला ४३, शिवम चौहान ४३; शाहबाज नदीम ४/७८, समर कद्री ३/७५)झारखंड (दुसरा डाव) : ३०.२ षटकात ५ बाद १७८ धावा (इशान किशन ८६; संजय पहल २/३६, युझवेंद्र चहल २/४३)