शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हिमा दासची 'सोनेरी धाव' बॉलिवूड पडद्यावर, 'खिलाडी' अक्षय कुमार बनवणार चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 18:28 IST

Hima das: बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार याला भारताची धावपटू हिमा दासच्या कामगिरीने प्रभावित केले आहे.

मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार याला भारताची धावपटू हिमा दासच्या कामगिरीने प्रभावित केले आहे. तिचा प्रवास हा आजच्या जनरेशनसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे, असे त्याला वाटते. म्हणूनच त्याने भविष्यात या रिअल लाईफ खिलाडीवर  जीवनपट बनवायची इच्छा व्यक्त केली आहे. हिमाने भारताला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ट्रॅक प्रकारात पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. तिच्या या सुवर्णपदकापर्यंतचा थक्क करणारा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला. त्याला अक्षयचाही समावेश आहे. 

हिमाने 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून दिले. तिने 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ही विक्रमी कामगिरी केली. शेतक-याच्या मुलीने घेतलेल्या या फिनिक्स भरारीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडा व अभिनय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी कौतुक केले. आसामच्या हिमाने 51.46 सेकंदाची वेळ नोंदवून 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक नावावर केले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आणि त्याशिवाय ट्रॅक प्रकारातील भारताचे हे पहिलेच सुवर्ण ठरले. 

मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात कोणत्या महिला खेळाडूवर जीवनपट बनवायला आवडेल या प्रश्नावर अक्षय म्हणाला, हिमा दासची संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. तिचा हा थक्क करणारा प्रवास मोठ्या पडद्यावर आल्यास अनेकांना जगण्याची, लढण्याची प्रेरणा मिळेल. त्यामुळे तिच्यावर जीवनपट बनवायला नक्की आवडेल. 

टॅग्स :Hima Dasहिमा दासSportsक्रीडा