शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

पैसे मोजूनही हेल्मेटची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: March 16, 2016 08:39 IST

सामना पाहायला येणाऱ्या दुचाकीस्वार प्रेक्षकांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी हेल्मेट व बॅगसह स्टेडियमच्या आत नेण्यास मज्जाव केल्याने हेल्मेटची सुरक्षा करताना अनेकांची तारांबळ उडाली.

सामना पाहायला येणाऱ्या दुचाकीस्वार प्रेक्षकांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी हेल्मेट व बॅगसह स्टेडियमच्या आत नेण्यास मज्जाव केल्याने हेल्मेटची सुरक्षा करताना अनेकांची तारांबळ उडाली. शेकडो हेल्मेटधारकांना जामठा स्टेडियमबाहेर असलेल्या तात्पुरत्या स्टॉल्सवर पैसे मोजून हेल्मेट ठेवावे लागले. स्टेडियमबाहेर सात स्टॉल्स सजले होते. त्यात अनेकांनी हेल्मेट व बॅग ठेवण्यासाठी ३० ते ५० रुपये मोजले. यातील पाच स्टॉल्स जामठ्यातील रहिवाशांचे आणि दोन स्टॉल बुटीबोरी येथे राहणाऱ्या इसमाचे होते. त्यांनी हेल्मेट ठेवणाऱ्यांना नंबर असलेली चिठ्ठी दिली होती. सामना संपल्यानंतर अर्ध्या तासात परत या अशी तंबीही देत होते.पोलिसांकडे याबाबत विचारणा केली असता, एका पोलीस निरीक्षकाने सांगितले, की आम्ही या स्टॉलधारकांना हेल्मेट सांभाळण्याची अधिकृत परवानगी दिलेली नाही. ते पैसे घेत आहेत व ज्या क्रिकेट चाहत्यांना आपले हेल्मेट ठेवणे गरजेचे आहे ते स्त:च्या जबाबदारीवर हेल्मेट जमा करीत आहेत. सामना सुरू झाल्यानंतर हेल्मेट सांभाळणाऱ्या व्यक्तीने पोबारा केला तर त्याला शोधणे कठीणही जाऊ शकते. टी स्टॉलवरदेखील काहींनी हेल्मेट ठेवले आहे. पण हेल्मेट सांभाळणारे बेपत्ता झाले तर शोधायचे कसे, हा देखील शोधाचा विषय आहे. ‘सौदागर अ‍ॅन्ड कंपनी’ अशी चिठ्ठी देणाऱ्या एका स्टॉलवर परिसरातील अनेक चाहत्यांनी हेल्मेट ठेवले. पण सामना संपेपर्यंत हेल्मेट वाऱ्यावर सोडल्यासारखेच असल्याचे या हेल्मेटधारकांचे मत होते.अनेक दुचाकीस्वार डबलसीट आल्याने त्यांनी एक हेल्मेट गाडीच्या मागे लॉक करून ठेवल्याचे दिसत होते. काहींनी लॅपटॉप आणि इतर साहित्याची बॅगदेखील या स्टॉलवर ठेवणे पसंत केले. स्टॉलवर हेल्मेटची गॅरंटी आहे काय, असे एका युवतीला विचारताच ती म्हणाली, ‘‘सध्यातरी सामना पाहायचा असल्याने रिस्क घ्यावीच लागेल. क्रिकेट फर्स्ट... बाकी सब भगवान भरोसे’’, अशी या युवतीची प्रतिक्रिया होती.