शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

हॅरि केनचा चेल्सीला तडाखा

By admin | Updated: January 3, 2015 02:28 IST

चेल्सीला गुरुवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत टोटेन्हॅम हॉटस्पूर संघाकडून ५-३ असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला.

लंडन : इंग्लिश प्रीमिअर लीगच्या (ईपीएल) गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या चेल्सीला गुरुवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत टोटेन्हॅम हॉटस्पूर संघाकडून ५-३ असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे चेल्सी मॅनेजर जोस मॉरिन्हो यांची वर्षाची सुरुवात निराशाजनक झाली. या पराभवामुळे चेल्सीला ४६ गुणांसह मॅन्चेस्टर सिटीसह अव्वल स्थानावर संयुक्तरीत्या समाधान मानावे लागले. हॉटस्पूरने ३४ गुणांसह सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. या विजयाचा स्टार ठरला तो दोन गोल करणारा २१वर्षीय हॅरी केन. मॉरिन्हो यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या चेल्सीला पहिल्यांदाच ५ गोल्स खावे लागले. १८व्या मिनिटाला डिएगो कोस्टाने चेल्सीचे खाते उघडले, परंतु ३०व्या मिनिटाला हॅरि केन याच्या गोलने सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर डॅनी रोझ (४४ मि.) व अ‍ॅड्रॉस टाऊनसेंड (४५ मि.) यांनी गोल करून हॉटस्पूरला मध्यांतरापर्यंत ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरानंतर केन याने गोल करून ही आघाडी आणखी मजबूत केली. (वृत्तसंस्था) च्केन, रोझ आणि टाऊनसेंड यांनी सात मिनिटांच्या कालावधीत तीन गोल करून चेल्सीला हतबल केले. याला एडन हजार्ड याने चोख पत्युत्तर दिले, परंतु नेसर चॅडली याने गोल करून त्याच्या उत्तराची हवा काढली. जॉन टेरीने ८७व्या मिनिटाला गोल केला. च्मात्र, हॉटस्पूरने ५-३ने विजय निश्चित केला. या पराभवानंतर चेल्सीचे मॅनेजर जोस मॉरिन्हो म्हणाले, बचावात आमच्याकडून चुका झाल्या. त्यात काही वैयक्तिक खेळाडूंच्याही चुकांचा समावेश आहे. नेसर चॅडली आणि हॅरि केन यांचे आक्रमण परतवणे सोपे नव्हते. 1991 मध्ये चेल्सीला ०-७ अशा फरकाने नॉटींगहॅम फॉरेस्टने पराभूत केले होते. त्यानंतर कोणत्याही संघाला त्यांच्याविरुद्ध पाचहून अधिक गोल करता आले नाहीत.2013मध्ये साऊथअ‍ॅम्पटनने चेल्सीला पहिल्या हाफमध्ये १-०ने पिछाडीवर टाकले होते. त्यानंतर गुरुवारी हॉटस्पूरने चेल्सीला ३-१ने पिछाडीवर टाकले.03 वेळा ईपीएलमध्ये चेल्सीविरुद्ध संघाला पाच गोल करण्यात यश आले आहे. याआधी १९९६मध्ये लिव्हरपूलने ५-१ने, तर २०११मध्ये आर्सेनलने ५-३ने चेल्सीला नमवले होते.