शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

हॅरिसनेही मिसळला जॉन्सनच्या सुरात सूर

By admin | Updated: January 4, 2015 01:25 IST

मिशेल जॉन्सननंतर आॅस्ट्रेलियन संघातील त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज रॅन हॅरिसनेही भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांबाबत टीका केली आहे.

सिडनी : मिशेल जॉन्सननंतर आॅस्ट्रेलियन संघातील त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज रॅन हॅरिसनेही भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्ट्यांबाबत टीका केली आहे. या मालिकेत संथ व चेंडूला विशेष उसळी न मिळणाऱ्या खेळपट्ट्यांचा वापर करण्यात आल्याचे हॅरिस म्हणाला. गेल्या अ‍ॅशेस मालिकेच्या तुलनेत या वेळी बळी घेण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली, असेही हॅरिस म्हणाला. चार सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतल्यानंतरही हॅरिसने फलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांबाबत निराशा व्यक्त केली. मंगळवारी सिडनीमध्ये प्रारंभ होणाऱ्या चौथ्या व अंतिम कसोटी सामन्यापूर्वी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना हॅरिस म्हणाला, ‘येथील खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्याचे भासत नाही. दोन कसोटी सामने निकाली ठरले असले, तरी गोलंदाज म्हणून आम्हाला खेळपट्टीवर अधिक हिरवळ अपेक्षित आहे.’ फॉर्मात असलेल्या हॅरिसला अ‍ॅशेस मालिकेच्या तुलनेत येथील खेळपट्ट्या संथ असल्याचे वाटत आहे. आॅस्ट्रेलियाने अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडचा ५-० ने सफाया केला होता. हॅरिस पुढे म्हणाला, ‘दोन सामने निकाली ठरले. मेलबोर्नमध्येही जवळजवळ निकाल शक्य होता. खेळपट्ट्यांबाबत टीका करणे अडचणीचे आहे. पण, गेल्या वर्षीच्या तुलनेत खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल नाही, हे मात्र खरे. कसोटी क्रिकेट नेहमी कठीण असते. आम्हाला असमान उसळी असलेल्या खेळपट्ट्या अपेक्षित आहे, असे माझे मत नाही. पण ज्यावेळी आम्ही भारतात गेलो होतो त्या वेळी आम्हाला अडचणीत आणणाऱ्या खेळपट्ट्या होत्या. त्यामुळे येथे आम्हाला हिरवळ असलेल्या खेळपट्ट्या मिळाल्या असत्या तर चांगले झाले असते.’ (वृत्तसंस्था)गेल्या वर्षी खेळपट्ट्या वेगवान गोलंदाजांना अनुकूल होत्या. त्या वेळी मिशेलसह माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. गेल्या वर्षी जॉन्स, सिडल व माझी कामगिरी चांगली झाली. पण, त्यात खेळपट्ट्यांची भूमिकाही महत्त्वाची ठरली; पण या वेळी मात्र तसे घडत नाही,त्यामुळे निराश झालो.- रॅन हॅरिस, गोलंदाजह्युजच्या स्मृती पुन्हा ताज्या होतील : वॉटसनफिलिप ह्युजचा मृत्यू झालेल्या मैदानावर पुन्हा खेळण्यास शेन वॉटसनमध्ये विशेष उत्साह नाही. भारताविरुद्ध येथे चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी ज्यावेळी मैदानात दाखल होईल त्या वेळी दिवंगत ह्युजच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतील, असे मत आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू शेन वॉटसनने व्यक्त केले. सिडनी क्रिकेट मैदानावर स्थानिक सामन्यादरम्यान सीन एबटचा बाउन्सर डोक्यावर आदळल्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ह्युजचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे आॅस्ट्रेलियन संघाला धक्का बसला होता. त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेच्या कार्यक्रमामध्ये बदल करावा लागला. आत ६ जानेवारीपासून प्रारंभ होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात पुन्हा एकदा या आठवणी ताज्या होणाऱ्या आहेत. वॉटसन म्हणाला, की फिलच्या अंत्यसंस्कारापूर्वी येथे आलो होतो. त्यानंतर प्रथमच या मैदानावर पाय ठेवणार आहे. मला या मैदानावर खेळण्याबाबत विशेष उत्सुकता नाही. अखेर फिलसोबत जे काही घडले त्यातून सावरण्यासाठी बराच वेळ मिळालेला आहे. पण या मैदानावर दाखल झाल्यानंतर पुन्हा त्या आठवणी ताज्या होतील.सिडनी कसोटीमध्ये जॉन्सनच्या खेळण्याबाबत साशंकता आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे शनिवारी सराव सत्रात सहभागी झाला नाही. त्यामुळे सिडनी कसोटीमध्ये जॉन्सनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. आॅस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत यापूर्वीच २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. जॉन्सन संघाचा प्रमुख गोलंदाज असून, दुखापतीमुळे तो सराव सत्रात सहभागी झाला नाही. यंदा आॅस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित आयसीसी विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगताना जॉन्सन सिडनी कसोटीतून माघार घेण्याची शक्यता आहे. या मालिकेत १३ बळी घेणाऱ्या ३३ वर्षीय जॉन्सनने शुक्रवारी स्नायूच्या दुखापतीबाबत सांगितले. त्यामुळे सिडनी कसोटीपूर्वी आयोजित सराव सत्रातून त्याने माघार घेतली.