शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

हरमनप्रीतची लढवय्या खेळी; रंगतदार लढतीत भारताची सरशी

By admin | Updated: February 22, 2017 01:30 IST

प्रभारी कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रतिकूल स्थितीत संयम कायम राखताना अखेरच्या दोन चेंडूंवर षटकार व दोन धावा

कोलंबो : प्रभारी कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रतिकूल स्थितीत संयम कायम राखताना अखेरच्या दोन चेंडूंवर षटकार व दोन धावा वसूल करीत भारताला आयसीसी महिला विश्वकप पात्रता फेरीच्या अंतिम लढतीत मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक गडी राखून विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका संघाचा डाव ४९.४ षटकांत २४४ धावांत संपुष्टात आला. प्रत्युत्तरात खेळताना दीप्ती शर्मा (७१) आणि मोना मेश्राम (५९) यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केल्यानंतरही भारतीय संघ संघर्ष करीत होता. मिताली राज दुखापतग्रस्त असल्यामुळे या लढतीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या हरमनप्रीतने जबाबदारीपूर्ण खेळी केली आणि भारताची या स्पर्धेतील विजयी मोहीम कायम राखताना जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारताला अखेरच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज होती आणि दोन विकेट शिल्लक होत्या. वेगवान गोलंदाज मार्सिया लेत्सोलोच्या या षटकात पहिल्या चेंडूवर दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात पूनम यादव धावबाद झाली. हरमनप्रीतकडे स्ट्राईक होता, पण तिला त्यानंतरच्या तीन चेंडूंवर धाव घेता आली नाही. त्यामुळे भारतीय तंबूत चिंता निर्माण झाली. या अनुभवी अष्टपैलू खेळाडूने संयम कायम राखत लेत्सोलोच्या पाचव्या चेंडूवर डीप मिडविकेटवर षटकार खेचला. भारताला अखेरच्या चेंडूवर विजयासाठी दोन धावांची गरज होती. हरमनप्रतीने फुलटॉस चेंडू लाँगआॅनच्या दिशेला खेळत वेगाने पळत दोन धावा वसूल केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. भारताने ५० षटकांत ९ बाद २४५ धावा फटकावल्या. हरमनप्रीतने ४१ चेंडूंमध्ये नाबाद ४१ धावा केल्या. त्यात दोन चौकार व एका षटकाराचा समावेश होता. द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिका संघाच्या जवळजवळ सर्वंच फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण एकाही महिला फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. दक्षिण आफ्रिकेतर्फे मिगुएन ड्यू प्रीज (४०), सलामीवीर लिजेल ली (३७), कर्णधार डेन वान निकर्क (३७) व सून ल्युस (३५) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तिरुष कामिनी (१०) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. त्यानंतर दीप्ती व मोना यांनी पुढील २५ षटके संयमी फलंदाजी करीत शतकी भागीदारी केली. या दोन्ही खेळाडू चार धावांच्या अंतरात तंबूत परतल्यामुळे भारताचा डाव अडचणीत आला. दीप्तीने ८९ चेंडूंत ८ चौकार लगावले, तर मोनाने ८२ चेंडूंमध्ये ७ चौकार व १ षटकार लगावला. वेदा कृष्णमूर्तीने २७ चेंडूंमध्ये ३१ धावांची खेळी केली. (वृत्तसंस्था) धावफलकदक्षिण आफ्रिका : एल. ली झे. वर्मा गो. पांडे ३७, एल. व्होलव्हार्डट झे. व गो. पूनम यादव २१, एम. ड्यू. प्रीझ झे. यादव गो. बिश्त ४०, टी. चेट्टी धावबाद २२, सी. एल. ट्रायोन त्रि. गो. शर्मा २३, डी. व्हॅन निकेर्क झे. कौर गो. पांडे ३७, एम. काप झे. कृष्णमूर्ती गो. गायकवाड १४, एस. ल्युस धावबाद ३५, एस. इस्माईल त्रि. गो. गायकवाड ०५, ए. खाका त्रि. गो. गायकवाड ०१, एम. एम. लेत्सोलो नाबाद ०३. अवांतर : ६. एकूण : ४९.४ षटकांत सर्व बाद २४४. गोलंदाजी : एस. पांडे ८-०-४१-२, बिष्ट ९.४-०-३९-१, आर. गायकवाड ९-०-५१-३, पूनम यादव १०-०-३७-१, डी. बी. शर्मा ९-०-४६-१, डी. पी. वैद्य ४-०-२८-०.भारत : मोना मेश्राम त्रि. गो. निकेर्क ५९, एमडीटी कामिनी झे. निकेर्क गो. काप १०, डी. बी. शर्मा झे. व्होलव्हार्डट गो. लेत्सोलो ७१, व्ही. कृष्णमूर्ती झे. चेट्टी गो. काप ३१, एच. कौर नाबाद ४१, एस. पांडे धावबाद १२, डी. पी. वैद्य त्रि. गो. खाका ००, एस. वर्मा त्रि. गो. इस्माईल ००, एकता बिष्ट त्रि. गो. खाका ०६, पूनम यादव धावबाद ०७, आर. एस. गायकवाड नाबाद ००. अवांतर : ८. एकूण : ५० षटकांत ९ बाद २४५. गोलंदाजी : इस्माईल १०-०-४३-१, एम. काप १०-०-३६-२, ए. खाका १०-१-५५-२, डी. निकेर्क १०-०-४६-१, एस. ल्यूस ४-०-२७-०, एम. लेत्सोलो ६-०-३५-१.