उत्तर विभागाचे नेतृत्व हरभजनकडे
By admin | Updated: October 18, 2014 23:22 IST
चंदीगढ:
उत्तर विभागाचे नेतृत्व हरभजनकडे
चंदीगढ: ऑफ स्पिनर हरभजनसिंगची 22 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या दुलीप ट्रॉफी सामन्यासाठी उत्तर विभागीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आह़े गौतम गंभीरची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आह़े हा निर्णय विक्रम राठोड यांच्या नेतृत्वाखालील उत्तर विभागीय निवड समितीच्या पीसीए क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला़ यावेळी उत्तर विभागीय सर्व संघांचे निवडकर्ते विनय लांबा (दिल्ली), राजेश बावा (हरियाणा), इदरिश गुंदरू ( जम्मू काश्मीर), पी़क़े गर्ग (एसएससीबी), भूपिंदर सिंग सिनिअर (पंजाब) उपस्थित होत़ेसंघ असा: कर्णधार हरभजनसिंग, गौतम गंभीर, जीवनज्योतसिंग, वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंग, मनदीपसिंग, रजत पालीवाल, रिषी धवन, नितीन सायनी, परवेज रसूल, परविंदर अवाना, हर्षल पटेल, एस़ बेग, गुरकीरतसिंग मान, यजुविंदरसिंग़