दुबई : आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहंमद हाफीज याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे़ विशेष म्हणजे यापूर्वी संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे पाकचा फिरकी गोलंदाज सईद अजमलवरही आयसीसीने निलंबनाची कारवाई केली आहे़३४ वर्षीय हाफीज विरुद्ध गत महिन्यात अबुधाबी येथे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संशयास्पद गोलंदाजी शैलीची तक्रार करण्यात आली होती़ त्यानंतर आयसीसीने रविवारी त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास बंदी घातल्याचा निर्णय घेतला़ २४ नोव्हेंबर रोजी हाफीजच्या गोलंदाजी शैलीची तपासणी करण्यात आली होती़ त्यावेळी त्याची गोलंदाजी शैली संशयास्पद आढळून आली आहे़ त्यामुळे तात्काळ त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे़ (वृत्तसंस्था)
हाफीज ‘आऊट’
By admin | Updated: December 8, 2014 01:01 IST