शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
2
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
3
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
5
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
6
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
7
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
8
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
9
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
10
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
11
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
12
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
13
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
14
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
15
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
16
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
17
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
18
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
19
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
20
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचा धुव्वा...

By admin | Updated: April 22, 2016 02:39 IST

एकहाती वर्चस्व राखलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दणदणीत विजय मिळवताना आतापर्यंत अपराजित राहिलेल्या गुजरात लायन्सला १० विकेट्सने लोळवले.

राजकोट : एकहाती वर्चस्व राखलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने दणदणीत विजय मिळवताना आतापर्यंत अपराजित राहिलेल्या गुजरात लायन्सला १० विकेट्सने लोळवले. सलग तीन सामने जिंकलेल्या गुजरातची या वेळी हैदराबादपुढे दाणादाण उडाली. गुजरातला ८ बाद १३५ धावांवर रोखल्यानंतर हैदराबादने एकही फलंदाज न गमावता १४.५ षटकांतच विजयी लक्ष्य गाठले. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानावर झालेल्या या लढतीत नाणेफेक जिंकून हैदराबादने यजमान गुजरातला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. गोलंदाजांनी, खास करून भुवनेश्वर कुमारने टिच्चून मारा करत गुजरातला २० षटकांत ८ बाद १३५ धावांवर रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन यांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर हैदराबादने १४.५ षटकांतच विजय मिळवला. वॉर्नरने ४८ चेंडंूत ९ चौकारांसह नाबाद ७४ धावा काढल्या, तर खराब फॉर्मशी झगणाऱ्या शिखरनेही फॉर्ममध्ये येत ४१ चेंडंूत ५ चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. या दोघांनी गुजरातच्या कोणत्याही गोलंदाजाला संधी न देता हैदराबादचा सलग दुसरा विजय साकारला.तत्पूर्वी, पहिल्याच षटकात आक्रमक अ‍ॅरोन फिंच बाद झाल्यानंतर कर्णधार सुरेश रैनाच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर गुजरातला ८ बाद १३५ धावांची मजल मारण्यात यश आले. रैना व ब्रँडन मॅक्युलम यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी करून संघाला सावरले. मात्र मॅक्युलमनंतर ठराविक अंतराने विकेट्स पडल्याने पुन्हा गुजरातची घसरगुंडी उडाली. मॅक्युलमसह दिनेश कार्तिक, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा झटपट बाद झाल्याने गुजरातच्या धावसंख्येला ब्रेक लागला. रैनाने एकाकी झुंज देताना ५१ चेंडंूत ९ चौकारांसह ७५ धावा फटकावल्या. भुवनेश्वरने २९ धावांत ४ बळी घेत गुजरातच्या फलंदाजीला खिंडार पाडले.संक्षिप्त धावफलक :गुजरात लायन्स : २० षटकांत ८ बाद १३५ धावा (सुरेश रैना ७५, ब्रँडन मॅक्युलम १८; भुवनेश्वर कुमार ४/२९, विपुल शर्मा १/१०, मुस्तफिझुर रहमान १/१९) पराभूत वि. सनरायझर्स हैदराबाद : १४.५ षटकांत बिनबाद १३७ (डेव्हिड वॉर्नर नाबाद ७४, शिखर धवन नाबाद ५३)