शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

गुजरात संघाचे दिमाखदार विजेतेपद

By admin | Updated: December 29, 2015 01:23 IST

कर्णधार पार्थिव पटेलचे कारकिर्दीतील पहिले शतक आणि त्यानंतर आर. पी. सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी केलेला भेदक मारा या जोरावर गुजरातने बलाढ्य दिल्लीचा १३९ धावांनी धुव्वा

बंगळुरु : कर्णधार पार्थिव पटेलचे कारकिर्दीतील पहिले शतक आणि त्यानंतर आर. पी. सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी केलेला भेदक मारा या जोरावर गुजरातने बलाढ्य दिल्लीचा १३९ धावांनी धुव्वा उडवून विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जवळपास १४ वर्षांपुर्वी पदार्पण केलेल्या पार्थिवने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताना गुजरातच्या विजयात निर्णायक खेळी केली. संघाला सुरुवातीला धक्के बसल्यानंतर त्याने रुजुल भट्टसह (६०) तिसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी केली. या दोघांच्या जोरावर गुजरातने ५० षटकांत २७३ धावांची अव्हानात्मक मजल मारली. चिराग गांधीनेही अखेरपर्यंत नाबाद राहताना ४४ धावांची आक्रमक खेळी करीत संघाच्या धावसंख्येत योगदान दिले. नवदीप सैनी, सुबोथ भाथी आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकरांनी जसप्रीत आणि आरपी यांच्या भेदकतेपुढे नांगी टाकली. दिल्लीचा डाव ३२.२ षटकांत केवळ १३४ धावांत गुंडाळून गुजरातने दिमाखात विजेतेपदावर नाव कोरले. आठव्या क्रमांकावरील पवन नेगी याने दिल्लीकडून सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर उन्मुक्त चंदने ३३ धावा काढल्या. या व्यतिरीक्त इतर फलंदाज झटपट परतले. सलामीवीर रिषभ पंत, शिखर धवन, कर्णधार गौतम गंभीर, मिलिंद कुमार हे प्रमुख फलंदाज ढेपाळल्याने दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जसप्रीतने केवळ २८ धावांत अर्धा संघ बाद करताना दिल्लीचे कंबरडे मोडले. तर आरपीने आपला सर्व अनुभव पणास लावताना शिखर धवन, गौतम गंभीर यांच्यासह एकूण ४ खंदे फलंदाज बाद केले.संक्षिप्त धावफलक गुजरात : ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा (पार्थिव पटेल १०५, रुजुल भट्ट ६०, चिराग गांधी नाबाद ४४; पवन नेगी २/३६, सुबोथ भाटी २/४३, नवदीप सैनी २/४६)दिल्ली : ३२.३ षटकांत सर्वबाद १३४ धावा (पवन नेगी ५७, उन्मुक्त चंद ३३; जसप्रीत बुमराह ५/२८, आरपी सिंग ४/४२)