शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

गुजरात लायन्सची विजयी ‘गर्जना’

By admin | Updated: April 12, 2016 12:14 IST

धडाकेबाज अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने केलेला भेदक मारा आणि सलामीवीर अ‍ॅरॉन फिंचच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर गुजरात लायन्स संघाने आपला पहिला आयपीएल विजय

मोहाली : धडाकेबाज अष्टपैलू ड्वेन ब्राव्होने केलेला भेदक मारा आणि सलामीवीर अ‍ॅरॉन फिंचच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर गुजरात लायन्स संघाने आपला पहिला आयपीएल विजय नोंदवताना बलाढ्य किंग्ज इलेव्हन पंजाबला ५ गडी राखून नमवले. पंजाबने दिलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने ५ फलंदाजांच्या मोबदल्यात १७.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. आक्रमक अर्धशतक ठोकणारा फिंच सामनावीर ठरला.आयएस बिंद्रा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातने यजमानांना ६ बाद १६१ धावांत रोखले. ड्वेन ब्राव्हो (४/२२) आणि रवींद्र जडेजा यांनी भेदक मारा करताना पंजाबला मर्यादित धावसंख्येवर रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात अडखळती झाली. पहिल्याच षटकात आक्रमक फलंदाज ब्रँडन मॅक्युलम बाद झाल्यानंतर फिंचने कर्णधार सुरेश रैनासह ५१ धावांची भागीदारी केली. रैना २० धावा काढून बाद झाला.पंजाब पुनरागमन करणार, असे दिसत होते. मात्र फिंच व दिनेश कार्तिक यांनी ६५ धावांची भागीदारी केली. फिंच ४७ चेंडूंत १२ चौकारांसह ७४ धावा काढून बाद झाला. यानंतर कार्तिकने अखेरपर्यंत किल्ला लढवून नाबाद ४२ धावांसह संघाच्या पहिल्यावहिल्या विजयावर शिक्का मारला. संदीप शर्मा, मिचेल जॉन्सन, मार्कस स्टोइनीस व प्रदीप साहू यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तत्पूर्वी, मुरली विजय व मनन व्होरा यांनी सावध सुरुवातीनंतर गुजरातच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. विजय - मनन यांनी ७८ धावांची आक्रमक सलामी देताना पंजाबला शानदार सुरुवात करून दिली. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर मनन झेलबाद झाला. मननने २३ चेंडूंत ३८ धावा काढताना ४ चौकार व २ षटकारांसह खेळी सजवली. विजयनेही त्याला चांगली साथ देत आक्रमक फलंदाजी केली. विजयने ३४ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ४२ धावा फटकावल्या. जडेजानंतर ब्राव्होचा ‘चॅम्पियन’ शो सुरू झाला. ब्राव्होने १२ व्या षटकात ग्लेन मॅक्सवेल (२) व कर्णधार डेव्हिड मिलर (१५) यांना बाद करून पंजाबच्या फलंदाजीला खिंडार पाडले. वृद्धिमान साहा (२०) व मार्कस स्टोइनीस (३३) यांनी ५५ धावांची भागीदारी केली. स्टोइनीसच्या आक्रमकतेच्या जोरावर पंजाबने दीडशेचा पल्ला गाठला. अखेरच्या षटकात पुन्हा एकदा ब्राव्होने दोन बळी घेत साहा व स्टोइनीसला बाद करून पंजाबला मर्यादित धावसंख्येवर रोखले. संक्षिप्त धावफलक :किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ६ बाद १६१ (मुरली विजय ४२, मनन व्होरा ३८, मार्कस स्टोइनीस ३३; ड्वेन ब्राव्हो ४/२२, रवींद्र जडेजा २/३०) पराभूत वि. गुजरात लायन्स : १७.४ षटकांत ५ बाद १६२ (अ‍ॅरॉन फिंच ७४, दिनेश कार्तिक ४२; संदीप शर्मा १/२१, मार्कस स्टोइनीस १/२७).