शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गॅरन्टी द्या, तरच प्रशिक्षकपदासाठी अर्ज करतो - रवी शास्त्री

By admin | Updated: June 23, 2017 06:57 IST

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत रवी शास्त्रींचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 23 - कर्णधार विराट कोहलीसोबतच्या वादानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयमध्ये संघासाठी नवा प्रशिक्षक निवडण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. सल्लागार समितीचे सदस्य सचिन, सौरव, लक्ष्मण यांच्याकडे भारतीय संघाच्या नव्या प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी आहे. या समितीला लवकरात लवकर कुंबळेच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करायची आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा प्रशिक्षकपदासाठी पर्यायी नावांचा विचार केला जात आहे. तसंच प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. त्यात आता विराटची पसंती असलेल्या रवी शास्त्रींचे नाव पुढे येत आहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रीसह वीरेंद्र सेहवाग, रिचर्ड पायबस, टॉम मुडी यांची नावेही चर्चेत आहेत. प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्यापूर्वी रवी शास्त्रीने एक अट ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. क्रिकेटनेक्स्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले प्रशिक्षकपदी निवड करण्याची हमी दिली तरच अर्ज करेन. प्रशिक्षकपदासाठी रांगेत उभं राहण्याचा प्रश्नच नाही. बीसीसीआय आणि सल्लागार समितीनं ही अट मान्य केली तर शास्त्रींचा प्रशिक्षकपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शास्त्रींचं नाव प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आल्यानं या पदासाठी अर्ज करणाऱ्या वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, रिचर्ड पायबस, लालचंद राजपूत आणि डोडा गणेश यांचा मार्ग खडतर झाला आहे, असं बोललं जात आहे.

6 महिन्यांपासून कोहली आणि कुंबळेमध्ये होता अबोलाकोहली आणि कुंबळेनं गेल्या वर्षी डिसेंबर 2016मध्ये इंग्लंड टेस्ट सीरिज संपल्यानंतर एकमेकांशी बोलणं थांबवलं होतं. दोघांमध्ये वाद होता ते माहीत होतं. मात्र ते 6 महिने एकमेकांशी बोलत नसल्यानं आम्हीसुद्धा अचंबित झालो, असंही बीसीसीआयच्या एका अधिका-यानं सांगितलं आहे. रविवारी भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या अंतिम सामन्यानंतर दोघांमध्ये एक बैठक झाली आणि एकमेकांसोबत काम करण्यास इच्छुक नसल्याचं दोघांनाही समजलं. अनिल कुंबळेला वादामागील कारण विचारण्यात आलं तेव्हा त्यानं विराटची कोणतीही समस्या नाही. पण माझ्या काम करण्याच्या पद्धतीवर कोहलीला आक्षेप असल्याचं कुंबळेनं सांगितलं, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच विराटला वाटायचं की, स्वतः क्षेत्रातही अनिल कुंबळे हस्तक्षेप करतोय. कुंबळे स्वतःचा सल्ला नेहमीच कोहलीला देत होता. मात्र कोहलीला त्याचा तो सल्ला स्वतःच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्यासारखा वाटायचा, असंही बीसीसीआयच्या अधिका-यानं सांगितलं आहे.

विराटनं कुंबळेच्या स्वागताचं ट्विट केलं डिलीटरागाच्या भरात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेच्या स्वागताचं ट्विट अकाऊंटवरून काढून टाकलं आहे. अनिल कुंबळेची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर 23 जून 2016 रोजी कोहलीनं हे ट्विट केलं होतं. कोहलीनं ट्विटमध्ये म्हटलं होतं की, अनिल कुंबळे सर तुमचं मनापासून स्वागत, आम्हाला तुमच्यासोबत काम करायला आवडेल.

प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयचा अर्ज मागविण्याचा निर्णयभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला आहे. अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. कुंबळे यांच्या कार्यशैलीवर कर्णधार विराट कोहलीने आक्षेप नोंदविल्यानंतर त्यांनी विंडीज दौऱ्यापर्यंत आपला करार वाढविण्यास नकार दिला. या प्रक्रियेसोबत जुळलेल्या बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, की अर्ज सादर करण्यासाठी ७ ते १० दिवसांचा कालावधी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यात उच्च पात्रता व दर्जा असलेल्या इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येईल.