शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संधी गमावल्याची खंत, पराभवानंतर मुलांकडे पाहून रडला जोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 07:51 IST

४ तास ३० मिनिटे रंगली लढत

विम्बल्डन : ‘माझ्याकडे अंतिम सामना जिंकण्याची संधी होती; पण मी काही चुका केल्या आणि ही संधी गमावली. याच गोष्टीची मला खंत आहे,’ असे सांगत सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने आपली निराशा व्यक्त केली. रविवारी रात्री विम्बल्डन अंतिम सामन्यात जोकोविचला स्पेनच्या कार्लोस अल्काराझविरुद्ध पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

पहिला सेट ६-१ अशा मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर दुसरा सेट टायब्रेकमध्ये जिंकण्यापासून जोकोविच केवळ एका गुणाने मागे होता. मात्र, ही संधी त्याने गमावली आणि अल्काराझने हा सेट जिंकत पुढे सामनाही जिंकला. यानंतर पाचव्या सेटमध्येही ब्रेक पॉइंट मिळवण्याच्या प्रयत्नात जोकोविचची वॉली चुकली आणि अल्काराझने मिळालेली संधी साधत बाजी मारली. म्हणूनच या पराभवानांतर, ‘नक्कीच खंत आहे,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.  जोकोविच म्हणाला की, ‘माझ्याकडे संधी होत्या. माझ्या मते दुसऱ्या सेटमधील टायब्रेकचा शेवट मी चांगल्याप्रकारे करू शकलो असतो. मात्र, जबरदस्त संघर्ष आणि शानदार बचावात्मक कौशल्य दाखवत अल्काराझने पुनरागमन केले. याचे श्रेय त्याला दिलेच गेले पाहिजे.’

४ तास ३० मिनिटे रंगली लढत२०१९ सालचा फेडरर आणि जोकोविच यांच्यातला विम्बल्डनचा अंतिम सामना तब्बल ४ तास ५७ मिनिटे चालला होता. विम्बल्डनच्या इतिहासात हा सर्वाधिक वेळ चाललेला सामना ठरला होता. रविवारी अल्काराझ-जोकोविच यांच्यातील लढत हा विक्रम मोडेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र असे होऊ शकले नाही. तरीसुद्धा तब्बल      ४ तास ३० मिनिटे ही मॅरेथॉन लढत झाली.

मुलांकडे पाहून जोको रडला!पराभव झाल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभात जोकोविच भावुक झाला. यावेळी स्टँडमध्ये उपस्थित त्याचा ८ वर्षीय मुलगा स्टीफन, मुलगी तारा आणि पत्नी येलेनाकडे पाहून जोकोविचला अश्रू अनावर झाले. जोकोविच म्हणाला की, ‘मुलं अजूनही येथे उपस्थित राहून स्मितहास्य करताना पाहून चांगले वाटले. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला पाठिंबा देण्यासाठी खूप धन्यवाद. मी तुम्हाला खूप प्रेमाने आलिंगन देईन.’ 

टॅग्स :TennisटेनिसWimbledonविम्बल्डन