शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

फिडे प्रमुखांनी राजीनामा द्यावा; ग्रँडमास्टर कार्लसनची मागणी, जागतिक बुद्धिबळात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 11:13 IST

जागतिक बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) प्रमुख अर्कडी डोरकोविच यांच्याविरोधात गंभीर आरोप

Magnus Carlsen FIDE President Arkady Dvorkovich Controversy :  नवी दिल्ली: जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन याने जागतिक बुद्धिबळ महासंघाचे (फिडे) प्रमुख अर्कडी डोरकोविच यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 'खेळाडूंवर जबरदस्ती करणे, सत्तेचा दुरुपयोग आणि दिलेले वचन न पाळणे,' असे आरोप डोरकोविच यांच्यावर लावत कार्लसन याने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

कार्लसन याने जर्मनीचे उद्योगपती जॉन हेन्रीक यांच्यासह मिळून 'फ्रीस्टाइल बुद्धिबळ टूर' स्पर्धेची स्थापना केली असून, त्याने यासाठी फिडेसोबत करार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये अडचणी आल्यानंतर कार्लसनने डोरकोविच यांच्यावर टीका करत त्यांनी पद सोडावे, अशी मागणी केली.

या टूरमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना अधिकृत जागतिक अजिंक्यपद सत्रासाठी कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध करण्याबाबत स्वाक्षरी करण्यास फिडेने सांगितले होते. फ्रीस्टाइल टूरने फिडेच्या प्रतिक्रियेवर टीका केली असून, त्याचवेळी त्यांनी आपल्या 'ग्रँड फिनाले'साठी जागतिक अजिंक्यपद शब्दाचा वापर न करण्याबाबत सहमतीही दर्शविली.

न्यूयॉर्कमध्ये रॅपिड आणि ब्टिझ स्पर्धेतील माझ्या सहभागासाठी डोरकोविच यांनी १९ डिसेंबरला माझ्या वडिलांना संदेश पाठविला होता. त्यात त्यांनी फिडे आणि फ्रीस्टाइलमध्ये जी काही चर्चा होईल, त्याने खेळाडू प्रभावित होणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी असेही सांगितले होते की, जर फिडे परिषदेत त्यांच्या बोलण्यास महत्त्व दिले गेले नाही, तर ते आपले पद सोडतील. आता त्यांनी आपले वचन मोडले आहे. मग, डोरकोविच आता राजीनामा द्याल का तुम्ही?मॅग्नस कार्लसन, ग्रँडमास्टर, नॉर्वे

 

टॅग्स :Chessबुद्धीबळ