शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाविना पटेलच्या कामगिरीवर सरकार खुश, रौप्य पदकानंतर बक्षिसांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 17:38 IST

ऑलिंपिक स्पर्धेतील Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा यिंग झोयूने पराभव केला. यावेळी चीनच्या यिंग झोयूने भाविनावर  3-0 (11-7, 11-5, 11-6 ) असा शानदार विजय मिळवला.

ठळक मुद्देगुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिव्यांग खेलरत्न प्रोत्साहन पुरस्कार योजनेचा तीन कोटी रुपयांच्या रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला आहे

अहमदाबाद - टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल हिला Class 4 च्या अंतिम फेरीत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा सामना चीनच्याच यिंग झोयूशी झाला आहे. भावनाच्या विजयानंतर देशभरातून तिचं कौतुक होत आहे. तसेच, तिच्यावर बक्षिसांचा वर्षावही सुरू आहे. गुजरात सरकारने तिच्या चंदेरी कामगिरीची दखल घेत राज्य सरकारकडून 3 कोटी रुपये बक्षीस जाहीर केलं आहे.  

ऑलिंपिक स्पर्धेतील Class 4 च्या अंतिम लढतीत भाविनाचा यिंग झोयूने पराभव केला. यावेळी चीनच्या यिंग झोयूने भाविनावर  3-0 (11-7, 11-5, 11-6 ) असा शानदार विजय मिळवला. दरम्यान, पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस खेळात अंतिम फेरी गाठणारी भाविना पहिलीच भारतीय खेळाडू आहे. भावनाच्या या कामिगिरीनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक दिग्गजांनी तिचं अभिनंदन करत कौतुक केलंय. आता, तिच्यावरही बक्षिसांचा वर्षाव होत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिव्यांग खेलरत्न प्रोत्साहन पुरस्कार योजनेचा तीन कोटी रुपयांच्या रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केला आहे. दरम्यान, यापूर्वी टेबल टेनिस ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि हरयाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी भाविना पटेलच्या यशानंतर तिला 31 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. 

यापूर्वीही अनेक स्पर्धेत मिळवले रौप्य

भाविनाने तेरा वर्षांपूर्वी अहमदाबाद शहरातल्या वस्त्रापूर भागात टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली. भाविना व्हीलचेअरवर बसून खेळते. बाराव्या वर्षी तिला पोलिओ असल्याचे स्पष्ट झाले. या आजाराने खचून न जाता भविनाने दमदार वाटचाल केली आहे. 2011 मध्ये भाविनाने थायलंड इथे झालेल्या अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करत जागतिक क्रमवारीत द्वितीय स्थानी झेप घेतली होती. 2013मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आशियाई पॅरा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भाविनाने रौप्यपदक पटकावले होते.

सुवर्णपदकाने दिली हुलकावणी

भाविनाने जॉर्डन, तैवान, चीन, दक्षिण कोरिया, जर्मनी, इंडोनेशिया, स्लोव्हेनिया, थायलंड, स्पेन, नेदरलॅण्डस, इजिप्त येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने भाग घेतला, पदकं मिळवली. पण, सुवर्ण पदक मात्र कायम तिला हुलकावणी देत राहिले. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021GujaratगुजरातVijay Rupaniविजय रूपाणीSilverचांदी