शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

गुजरातचे ‘गोड बोला’

By admin | Updated: January 15, 2017 04:40 IST

कर्णधार पार्थिव पटेलने प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेल्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने शनिवारी संपलेल्या लढतीत ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या

इंदूर : कर्णधार पार्थिव पटेलने प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेल्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर गुजरातने शनिवारी संपलेल्या लढतीत ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळविणाऱ्या मुंबईचा पाच गडी राखून पराभव केला आणि प्रथमच रणजी करंडकावर नाव कोरले. या विजयाबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी संघाचे अभिनंदन केले आहे.मुंबईने गुजरातपुढे विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पार्थिवच्या १४३ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर गुजरातने पाचव्या व अखेरच्या दिवशी पाच गडी राखून विजय साकारला आणि राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. गुजरातने रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत सर्वांत मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम नोंदविला. यापूर्वीचा विक्रम हैदराबादच्या नावावर होता. १९३८ मध्ये नवानगरविरुद्ध त्यांनी ९ बाद ३१० धावांची मजल मारत लक्ष्य गाठले होते. गुजरातने ६६ वर्षांपूर्वी १९५०-५१ मध्ये अंतिम फेरी गाठली होती, पण त्यावेळी त्यांना होळकर (आता मध्य प्रदेश) संघाविरुद्ध इंदूरमध्येच खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत १८९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. गुजरात रणजी चॅम्पियन ठरलेला १६ वा संघ आहे. गुजरातने २०१४-१५ मध्ये सैयद मुश्ताक अली टी-२० चषक आणि २०१५-१६ मध्ये विजय हजारे वन-डे करंडक पटकावला होता. आता तिन्ही स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावणारा गुजरात चौथा संघ ठरला आहे. गुजरातपूर्वी तामिळनाडू, बंगाल आणि उत्तर प्रदेश या संघांनी असा पराक्रम केलेला आहे. पार्थिव तिन्ही स्पर्धेत जेतेपद पटकावणारा पहिला कर्णधार ठरला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईचा हा केवळ पाचवा पराभव आहे. यापूर्वी त्यांना अखेरचा पराभव १९९०-९१ मध्ये हरियाणाविरुद्ध (२ धावांनी) स्वीकारावा लागला होता. त्यानंतर मुंबईने ११ वेळा अंतिम फेरी गाठली. त्यापैकी १० वेळा त्यांनी जेतेपदाचा मान मिळवला. गुजरात आज मुंबईचा विजयरथ रोखण्यात यशस्वी ठरला. कालच्या बिनबाद ४७ धावसंख्येवरून गुजरातने आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. याच धावसंख्येवर मोसमात सर्वाधिक १३१० धावा फटकावणारा सलामीवीर प्रियांक पांचाळ (३४) बाद झाला. पांचाळला बलविंदर संधूने (२-१०१) तंबूचा मार्ग दाखवला. संधूने त्यानंतर नवा फलंदाज भार्गव मेराईला (२) यालाही अधिक काळ टिकण्याची संधी दिली नाही. समित गोहल (२१) बाद झाल्यानंतर गुजरातची ३ बाद ८९ अशी अवस्था झाली. त्यानंतर पार्थिवने मनप्रीत जुनेजाच्या (५४) साथीने चौथ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करीत गुजरातच्या विजयाचा मार्ग सुकर केला. मनप्रीतला अखिल हेरवाडकरने बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. रुजुल भटने (नाबाद २७) पार्थिवला चांगली साथ दिली. भट केवळ एक धावेवर असताना तारेने त्याचा सोपा झेल सोडला होता. त्यावेळी चेंडू यष्टिरक्षकाचे मागे असलेल्या हेल्मेटला लागला. त्यामुळे मुंबईला पाच पेनल्टी धावा गमवाव्या लागल्या. भट त्यानंतरही दोनदा सुदैवी ठरला. दरम्यान, सामनावीर पार्थिव संधूच्या गोलंदाजीवर तीन चौकार ठोकत शतकासमीप पोहोचला. हेरवादकरच्या गोलंदाजीवर दोन धावा वसूल करीत त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले २५ वे शतक पूर्ण केले. (वृत्तसंस्था)धावफलक...मुंबई (पहिला डाव) : ८३.५ षटकांत सर्वबाद २२८ धावा.गुजरात (पहिला डाव) : १०४.३ षटकांत सर्वबाद ३२८ धावा.मुंबई (दुसरा डाव) १३७.१ षटकांत सर्वबाद ४११ धावा.गुजरात (दुसरा डाव) : समित गोहेल झे. तारे गो. नायर २१, प्रियांक पांचाळ झे. यादव गो. संधू ३४, बीएच. मेराई त्रि. गो. संधू ०२, पार्थिव पटेल झे. व गो. ठाकूर १४३, मनप्रीत जुनेजा झे. तारे गो. हेरवादकर ५४, रुजुल भट नाबाद २७, चिराग गांधी नाबाद ११. अवांतर - २१. एकूण : ८९.५ षटकांत ५ बाद ३१३ धावा. बाद क्रम : १-४७, २-५१, ३-८९, ४-२०५, ५-२९९. गोलंदाजी : शार्दुल ठाकूर २२.५-४-९०-१; बलविंदर संधू २४-४-१०१-२; विजय गोहिल १५-४-४६-०; अभिषेक नायर १५-४-३१-१, व्हीव्ही. दाभोळकर ४-०-१५-०, हेरवाडकर ९-१-१७-१.