वॉशिंग्टन : इंडियन प्रीमिअर लीगचा ज्वर चांगलाच चढला आहे. वेगवेगळ्या अॅपच्या माध्यमातून आवडत्या खेळाडूची निवड करून मालामाल होण्याची संधीही आता विविध प्लॅटफॉर्ममधून क्रिकेट चाहत्यांना उपलब्ध झाली आहे. भारतात हे व्यासपीठ गेल्या काही वर्षभरापासून सुरू झाले असले तरी परदेशात फार आधीपासून असे अॅप आहेत आणि तेथे बेटिंग हे अधिकृतही आहे. अशाच एका बेटिंगमध्ये एका चाहत्याने छप्परफाड कमाई केली आहे. वॉशिंग्टनमधील जेम्स अॅड्युचीने 60 लाखांची बेटिंग लावली होती आणि त्यात त्याने तब्बल 8,28,86,475 रुपयांची ( 1.2 मिलियन डॉलर) कमाई केली.
छप्परफाड कमाई, 60 लाखांची बेट लावली अन् जिंकले 8 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 11:13 IST