शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

'सोनेरी दिवस' सुशील कुमारचे 'गोल्डन कमबॅक', साक्षी मलिकनंही पटकावलं गोल्ड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2017 22:42 IST

सुशील कुमार आणि साक्षी मलिकनं जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे.

जोहान्सबर्ग  : भारताचा स्टार मल्ल सुशील कुमार याने अपेक्षित कामगिरी करताना जोहान्सबर्ग येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकास गवसणी घातली. दुसरीकडे, स्टार महिला मल्ल साक्षी मलिक हिनेही आपला लौकिक कायम राखताना सुवर्ण कमाई केली. यानिमित्ताने भारताच्या दोन्ही आॅलिम्पिक पदक विजेत्या मल्लांनी पुन्हा एकदा अभिमानाने तिरंगा फडकावला. महिलांच्या फ्रीस्टाइल ६२ किलो वजनी गटामध्ये साक्षीने आपले वर्चस्व राखताना न्यूझीलंडच्या तायला तुअहिने फोर्ड हिला १३-२ असे सहजपणे लोळवत बाजी मारली. साक्षीच्या भक्कम पकडी आणि चपळ डावांपुढे फोर्डचा काहीच निभाव लागला नाही. साक्षीने केलेल्या काही माफक चुकांमुळे फोर्डला २ गुणांचे समाधान लाभले. 

तत्पूर्वी, तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये पदार्पण केलेल्या सुशीलने ७४ किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाइलमध्ये न्यूझीलंडच्याच आकाश खुल्लरला चीतपट करत सुवर्ण पदकावर कब्जा केला. या जेतेपदासह सुशीलने दिमाखात आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले. याआधी २०१४ साली ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पटकावल्यानंतर सुशीलचे हे दुसरे आंतरराष्ट्रीय पदक ठरले. विशेष म्हणजे याच गटात भारताच्या प्रवीण राणाने कांस्य पदक पटकावताना भारतीयांचा आनंद द्विगुणित केला. 

यंद कोणत्याही विशेष लढतीविना राष्ट्रीय जेतेपद पटकावलेल्या सुशीलला उपांत्य सामन्यात प्रवीण राणाचे आव्हान मिळाले. प्रवीणनेच राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम सामन्यात माघार घेत सुशीलला सुवर्ण बहाल केले होते. त्यावरुन बराच वादही उफाळला होता. मात्र, यावेळी या दोघांना लढावे लागले आणि त्यात सुशीलने ५-४ अशी बाजी मारत अंतिम फेरी गाठली, तर प्रवीणला कांस्य पदकासाठी लढावे लागले. याआधी सुशीलने पहिल्या लढतीत कॅनडाच्या जसमीत सिंग फुलका याला मात दिली होती

तीन वर्षांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यात यशस्वी ठरलो. मी माझ्या आई-वडिलांना, माझे गुरु पैलवान सतपालजी , अध्यात्मिक गुरु योगॠषी स्वामी रामदेव आणि प्रत्येक देशवासीयाला हे पदक समर्पित करतो. जय हिंद.- सुशील कुमार