शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची क्रीडा प्रबोधिनीत आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 02:25 IST

पाच राज्य स्पर्धेत राखले होते वर्चस्व; गळफास लावून संपविले आयुष्य

अकोला : राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेला नागपूरचा बॉक्सर प्रणव राष्ट्रपाल राऊत (वय १८) याने येथील लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावरील शासकीय क्रीडा प्रबोधिनीतील वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नागपुरात पोलीस लाईन टाकळी येथे राहणारा राष्ट्रीय बॉक्सर प्रणव हा काही वर्षांपासून क्रीडा प्रबोधिनीत बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत होता. तो येथे ११ व्या वर्गात शिक्षण घेत होता. राज्य स्पर्धेत पाच सुवर्णपदकांचा मानकरी असलेल्या प्रणवने जानेवारीमध्ये दिल्लीत राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. शुक्रवारी सकाळी प्रणवने क्रीडा प्रबोधिनीच्या होस्टेलमधील रूम क्रमांक ४ मध्ये गळफास घेतला. प्रणव खोलीतून बाहेर येत नसल्याने, त्याच्या मित्रांनी रूमचा दरवाजा ठोठावला; परंतु त्याने दरवाजा उघडला नाही. अखेर मित्रांनी दार तोडले आणि त्यांना प्रणव फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर क्रीडा अधिकाऱ्यांसह प्रशिक्षक सतीशचंंद्र भट्ट व मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वडील राष्ट्रपाल राऊत नागपूर शहर पोलीस दलात कर्मचारी आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करणार आहेत.निराशेपोटी उचलले टोकाचे पाऊलप्रणव गुरुवारपर्यंत व्यवस्थित होता. त्याचे बोलणे, वागणे अर्थात देहबोलीवरून तो तणावात नसल्याचे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. प्रणव चार वर्षांपूर्वी अकोला क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाला होता. त्याने १४,१७ व १९ वर्षीय वयोगटातील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले होते. यंदा औरंगाबाद येथे झालेल्या राज्य स्पर्धेत त्याने सुवर्णपदकही जिंकले होते.जानेवारीमध्ये दिल्लीत झालेल्या स्पर्धेत त्याने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्वही केले. दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्यानंतर रोहतकमध्ये २७ ते २९ जानेवारी या कालावधीत झालेल्या भारतीय संघ निवड चाचणीतही सहभाग नोंदवला होता. तेथे अपयश आल्यामुळेच प्रणवने निराशेपोटी हे टोकाचे पाऊल उचचले असावे, अशी क्रीडा क्षेत्रात चर्चा आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याAkolaअकोला