ईश्वर, देविका प्रथम
By admin | Updated: September 2, 2014 23:04 IST
शालेय तायक्वांदो स्पर्धा : दर्शन, ज्ञानेश्वरी द्वितीय
ईश्वर, देविका प्रथम
शालेय तायक्वांदो स्पर्धा : दर्शन, ज्ञानेश्वरी द्वितीयऔरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर नुकत्याच झालेल्या शालेय तायक्वांदो स्पर्धेत ईश्वर ताटू आणि देविका पाराशर यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळविला, तर दर्शन पाटणी आणि ज्ञानेश्वरी शेवाळे हे द्वितीय ठरले़स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या ६४ किलोहून अधिक गटात ईश्वर ताटू हा प्रथम ठरला, तर मुलींच्या गटात ६० किलोहून अधिक गटात देविका पाराशर ही अव्वल ठरली़ दर्शन पाटणी हा ५६ किलो वजन गटात द्वितीय ठरला, तर ज्ञानेश्वरी शेवाळे हिने ४८ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक पटकावला़ स्पर्धेत कमलेश धुळमारे, आदिराज चिंचपुरे, उत्कृर्ष सोनवणे, राहुल कटारीया, कनिषा गिरे, नेहा राजपूत, दर्शना साळवे, अक्षय तांबट यांना आपापल्या गटात तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले़ खेळाडूंना गजेंद्र गवंडर यांचे मार्गदर्शन लाभत आहे़ यशाबद्दल शांतीनिकेत पब्लिक स्कूलचे संस्थापक राजेश पवार, मुख्याध्यापिका चंद्रकला शर्मा, प्रेमलता सावळे, मनीषा शेवाळे, तानाजी बिराजदार, अर्चना तिळवे, अरुण मोरे, सय्यद तौफिक यांनी अभिदंन केले आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)