शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सर्वोत्तम क्षमतेसह आॅलिम्पिक पदक जिंकण्याचे लक्ष्य : दुती चंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 23:26 IST

दुती चंद आॅलिम्पिक पदक जिंकण्याच्या एकमेव लक्ष्यासह सरावात व्यस्त

नवी दिल्ली : जकार्ता येथील आशियाई स्पर्धेत १०० मीटर आणि २०० मीटर अशा दोन्ही स्पर्धांमध्ये रौप्यपदकविजेती नवी ‘धावसम्राज्ञी’ दुती चंद आॅलिम्पिक पदक जिंकण्याच्या एकमेव लक्ष्यासह सरावात व्यस्त आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आफ्रिकेच्या धावपटूंचे अवघड आव्हान असेल, असे स्पष्ट करून ‘टूर डी कलिंगा’ची ब्रँड दूत दुती म्हणाली, ‘‘आॅलिम्पिकमध्ये आफ्रिकेतील धावपटूंशी स्पर्धा असली, तरी त्याचा फरक पडत नाही. विविध देशानुसार शारीरिक क्षमता व्यक्तीमध्ये असतात. माझ्यातील सर्वोत्तम क्षमतेचा वापर करून पदकाच्या ईर्षेने धावणे, हीच माझी जबाबदारी असेल. आशियाडमध्ये १०० मीटर शर्यतीत ११.३२ सेकंद वेळ नोंदविली. आॅलिम्पिकसाठी ११.१० सेकंद ही वेळ गाठण्याची गरज असेल.‘‘मी कधीही हार मानणारी नाही. बालपणापासून आव्हानांचा सामना करीत आले; पण परिस्थितीशी झगडून प्रशिक्षणावर लक्ष देते. यामुळेच मला पाठोपाठ यश मिळत आहे. आशियाडमध्ये बहरिनची धावपटू एडिडियोंग ओडियांगला आव्हान दिल्याचा मला आनंद आहे.ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी आशियाई पदकानंतर पुढील मोहिमांसाठी सर्वतोपरी आर्थिक साह्याचे आश्वासन दिले. आतापर्यंत मी कधीही परदेशात प्रशिक्षण घेतले नव्हते. मात्र, आॅलिम्पिकसाठी परदेशात प्रशिक्षण गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय पदके मिळविणाऱ्या देशातील अव्वल धावपटूंनी परदेशात प्रशिक्षण घेतले आहे.’’शरीरात पुरुष संप्रेरके असल्याचे कारण देत आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने धावपटू दुतीवर काही वर्षांपूर्वी बंदी घातली होती. आंतरराष्टÑीय क्रीडा लवाद न्यायालयापुढे तिने दाद मागितली. संघर्षमय लढ्यानंतर दुतीला निर्दोष ठरविण्यात आले. दुती सध्या भुवनेश्वर येथील कलिंगा महाविद्यालयात एलएलबीच्या अखेरच्या वर्षाला आहे. स्पर्धा आणि सराव यांमुळे अभ्यासाला वेळ कमी पडतो, असे दुतीने सांगितले.दुती म्हणाली, ‘‘आधी क्रिकेटशिवाय काही प्रमाणात फुटबॉल आणि हॉकीला महत्त्व दिले जात होते; पण गेल्या काही वर्षांत खेळाकडे पाहण्याचा भारतीयांचा दृष्टिकोन बदलला. आशियाडमधील पदकांमुळे अन्य खेळांकडेदेखील सन्मानाने पाहिले जात आहे. अ‍ॅथलिटदेखील देशाची शान वाढवू शकतात, ही बाब माझ्या पदकांमुळे स्पष्ट झाली आहे,’’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :Dutee Chandद्युती चंद