विश्वचषकासाठी गोवा यजमान!
By admin | Published: June 30, 2015 02:10 AM2015-06-30T02:10:25+5:302015-06-30T02:10:25+5:30
जागतिक पातळीवरील फुटबॉल स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे.२०१७ मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान गोव्यालाही मिळाला आहे
पणजी : जागतिक पातळीवरील फुटबॉल स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे.२०१७ मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान गोव्यालाही मिळाला आहे. त्यासाठी देशातील सहा शहरांपैकी एक संभाव्य केंद्र म्हणून गोव्याची निवड करण्यात आल्याची अधिकृत घोषणा स्पर्धेचे तांत्रिक संचालक जेवियर सिप्पी यांनी पत्रकार परिषदेत दिली. गोव्याबरोबरच गुवाहाटी, कोची, कोलकता, नवी मुंबई आणि दिल्ली येथील स्पर्धा केंद्रांचा संभाव्य यादीत समावेश आहे.
सिप्पी म्हणाले, की स्पर्धेसाठी गोव्यात चार प्रशिक्षण मैदान आणि एका मुख्य मैदानाची निवड करण्यात आली आहे. ही सर्व मैदाने फिफाच्या दर्जानुसार तयार केली जातील. यामध्ये बाणावली, वास्को, कुंकळ्ळी आणि उत्तोर्डा यांचा समावेश आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर स्पर्धेतील मुख्य सामने खेळविण्यात येतील. या चारही केंद्रांवर प्रत्येकी सहा सामने खेळविण्यात येतील.