शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गज मेरीकोमची सहजपणे उपांत्यपूर्व फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 05:28 IST

भारताची अनुभवी बॉक्सर मेरीकोमने सहज बाजी मारताना थायलंडच्या जुटामास जिटपोंग हिचा ५-० असा धुव्वा उडवला.

उलान उदे (रशिया) : सहा वेळची विश्वविजेती दिग्गज बॉक्सर एमसी मेरीकोम हिने ५१ किलो गटातून मंगळवारी अपेक्षित कामगिरी करताना महिला जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी दुसरीकडे भारताची अन्य बॉक्सर स्वीटी बूरा हिला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.भारताची अनुभवी बॉक्सर मेरीकोमने सहज बाजी मारताना थायलंडच्या जुटामास जिटपोंग हिचा ५-० असा धुव्वा उडवला. दरम्यान, सामना एकतर्फी रंगलेला दिसत असला, तरी जिटपोंगने शानदार खेळ करताना ३६ वर्षीय मेरीकोमविरुद्ध कडवी झुंज दिली. तिने काही आक्रमक ठोसे मारताना मेरीकोमला अनेकदा गोंधळवलेही, परंतु तरीही जिटपोंगला बलाढ्य मेरीकोमविरुद्ध गुण घेण्यात यश आले नाही. स्पर्धेत तिसरे मानांकन मिळालेल्या मेरीकोमला पहिल्या फेरीत बाय मिळाला. यानंतरच्या लढतीत मेरीकोमने सावध सुरुवात करताना पहिल्या तीन मिनिटांपर्यंत जिटपोंगच्या खेळाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मात्र मेरीकोमने आक्रमक पवित्र घेताना जिटपोंगला कोणतीही संधी दिली नाही.७५ किलो गटामध्ये भारताला मोठा धक्का बसला. माजी जागतिक रौप्य पदक विजेती स्वीटी बूराला दुसºया मानांकित लॉरेन प्राइसविरुद्ध १-३ असा पराभव पत्करावा लागला. प्राइस युरोपीयन अजिंक्यपद स्पर्धेची विजेती असून, गेल्या जागतिक स्पर्धेत तिने सुवर्ण जिंकले होते. प्राइस विद्यमान राष्ट्रकूल चॅम्पियनहीआहे. प्राइसचा सध्याचा जागतिक फॉर्म पाहता स्वीटीपुढे तगडे आव्हान होते.खंबीरपणे प्राइसच्या आव्हानाला सामोरे गेलेल्या स्वीटीने आपला सर्वोत्तम खेळ केला. तिने अनेक आश्वासक ठोसे लगावताना छापही पाडली. आक्रमक सुरुवात केलेल्या स्वीटीने सामन्यावर पकड मिळवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिला अपेक्षित यश मिळाले नाही. अखेर प्रशिक्षकांचा निर्णय प्राइसच्या बाजूने लागला आणि स्वीटीचे आव्हान संपुष्टात आले.

टॅग्स :Mary Komमेरी कोमboxingबॉक्सिंग