शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

आॅस्ट्रेलियाची पाकवर मात

By admin | Updated: December 31, 2016 02:00 IST

मिशेल स्टार्कच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी अखेरच्या दिवशी पाकिस्तानचा एक डाव व १८ धावांनी पराभव करीत तीन

मेलबोर्न : मिशेल स्टार्कच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात शुक्रवारी अखेरच्या दिवशी पाकिस्तानचा एक डाव व १८ धावांनी पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. वेगवान गोलंदाज स्टार्कने विक्रमी सात षट्कार ठोकत ९१ चेंडूंमध्ये ८४ धावांची खेळी केल्यानंतर ३६ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेत आॅस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानचा दुसरा डाव ५३.२ षटकांत १६३ धावांत संपुष्टात आला. आॅफ स्पिनर नॅथन लियोनने ३३ धावांच्या मोबदल्यात ३, तर जोस हेजलवुडने ३९ धावांत २ बळी घेतले. पाकला पराभव टाळण्यासाठी किमान ७० षटके फलंदाजी करणे आवश्यक होते, पण त्यात ते अपयशी ठरले. त्याआधी, कर्णधार स्टीव्हन स्मिथने उपाहारापूर्वी ८ बाद ६२४ धावसंख्येवर पहिला डाव घोषित करीत निकालाच्या आशा पल्लवीत केल्या. पाकिस्तानने पहिला डाव ९ बाद ४४३ धावांवर घोषित केला होता. आॅस्ट्रेलियाने पहिल्या डावात १८१ धावांची आघाडी घेतली. सामनावीर स्मिथने २४६ चेंडूंना सामोरे जातना नाबाद १६५ धावांची खेळी केली. स्टार्कने मेलबोर्न क्रिकेट मैदानावर एका डावात सर्वाधिक ७ षट्कारांचा विक्रम नोंदवला. त्याने यासिर शाहला लक्ष्य करताना त्याच्याविरुद्ध पाच षट्कार ठोकले. स्टार्कने त्यानंतर गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करीत बाबर आजम, सरफराज अहमद, वहाब रियाज व यासिर यांना तंबूचा मार्ग दाखविला.सिडनीमध्ये १९९५ मध्ये मिळवलेल्या विजयानंतर पाकिस्तानचा आॅस्ट्रेलियामध्ये हा सलग ११ वा कसोटी पराभव ठरला. त्याआधी, स्मिथ व स्टार्क यांनी सातव्या विकेटसाठी १७२ चेंडूंमध्ये १५४ धावांची भागीदारी केली. स्टार्कने ६९ चेंडूंमध्ये आठवे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. वैयक्तिक ५१ धावांवर सुदैवी ठरलेल्या स्टार्कने आक्रमक फलंदाजी केली. लियोन (१२) बाद झाल्यानंतर स्मिथने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. स्मिथने कारकिर्दीतील १७ वे आणि वर्षातील चौथे शतक १३ चौकार व १ षट्काराने सजवले. त्याने यंदा ७१.९३ च्या सरासरीने १०७९ धावा फटकावल्या. पाकची दुसऱ्या डावात सुरुवात निराशाजनक झाली. आॅस्ट्रेलियाला उपाहारापूर्वी चार षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यात हेजलवुडने समी अस्लमला (२) माघारी परतवले. बाबर आजम (३), युनिस खान (२४), मिसबाह उलह-हक(००) आणि असद शफिक (१६) यांना मोठी खेळी करता आली नाही. चहापानाला खेळ थांबला त्यावेळी पाकची ५ बाद ९१ अशी अवस्था होती. त्यानंतर हेजलवुडने पहिल्या डावात द्विशतकी खेळी करणाऱ्या अझहर अली (४३) याला बाद करीत मोठा अडथळा दूर केला. बडने मोहम्मद आमीर (११) आणि स्टार्कने सरफराज अहमद (४३) व वहाब रियाज (०) यांना माघारी परतवले. स्टार्कने त्यानंतर यासिर शाहला (०) तंबूचा मार्ग दाखवित विजय निश्चित केला. (वृत्तसंस्था)