शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जर्मनीची अंतिम फेरीत धडक

By admin | Updated: July 1, 2017 02:04 IST

लिओन गोरेट्झा याने झळकावलेल्या शानदार दोन गोलच्या जोरावर विश्वविजेत्या जर्मनीने कॉन्फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेच्या

सोची (रशिया) : लिओन गोरेट्झा याने झळकावलेल्या शानदार दोन गोलच्या जोरावर विश्वविजेत्या जर्मनीने कॉन्फेडरेशन कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारताना मैक्सिकोला ४-१ असे लोळवले. विशेष म्हणजे या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा जर्मनीचा संघ चौथा युरोपियन संघ ठरला आहे. जर्मनीआधी डेन्मार्क, फ्रान्स आणि स्पेन यांनी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अप्रतिम आक्रमक खेळ केलेल्या जर्मनीची सुरुवात धडाकेबाज होती. गोरेट्झा याने यावेळी सर्व सुत्रे आपल्याकडे घेताना सुरुवातीपासूनच मैक्सिकोवर कमालीचे दडपण आणले. त्याने सामन्याची पहिले पाच मिनिटे झाल्यानंतर मैक्सिकोच्या गोलक्षेत्रात काही आक्रमक चाली रचून त्यांची बचावफळी खिळखिळी केली. त्यातच, सहाव्या आणि आठव्या मिनिटावर गोरेट्झाने शानदार गोल करुन जर्मनीला २-० अशी दमदार आघाडी मिळवून दिली. या स्वप्नवत सुरुवातीनंतर जर्मनीने आणखी आक्रमक पवित्रा घेत सामन्यावर मजबूत पकड मिळवली. यानंतर, मैक्सिकोने अतिबचावात्मक पवित्रा घेत जर्मनीचे आक्रमण रोखण्यात यश मिळवल्याने मध्यंतराला जर्मनीचे वर्चस्व कायम राहिले. दुसऱ्या सत्रात मात्र पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत जर्मनीने मैक्सिकोचे उरले सुरले आव्हान संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी, टिमो वर्नर (५९ मिनिट) आणि आमिन यूनिस (९१ मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करताना जर्मनीचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.दरम्यान, मैक्सिकोकडून एकमेव गोल मार्को फाबियान (८९ मिनिट) याने केला. परंतु, तोपर्यंत मैक्सिकोचा पराभव निश्चित झाला होता. विजेतेपदासाठी जर्मनीला रविवारी सेंट पिटर्सबर्ग येथे बलाढ्य चिलीच्या तगड्या आव्हानास सामोरे जावे लागेल. तसेच, मैक्सिको आणि पोर्तुगाल यांच्या तिसऱ्या स्थानासाठी अटीतटीची लढत होईल. (वृत्तसंस्था)