शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

गांगुली प्रकरणात हितसंबंधाचा मुद्दा नाही : मनोहर

By admin | Updated: December 8, 2015 23:53 IST

भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीबाबत हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित होत नाही, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीबाबत हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित होत नाही, असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी व्यक्त केले. उद्योगपती संजीव गोयंका यांची कंपनी न्यू राइझिंगने पुणे संघ विकत घेतल्यानंतर हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित झाला. कारण गांगुली संचालन परिषदेचा सदस्य आहे त्याचप्रमाणे इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) सहभागी झालेला फुटबॉल संघ एटलेटिको डी कोलकाताचा सहमालक आहे. संजीव गोयंकाचा एटीकेच्या मालकांमध्ये समावेश आहे. गांगुलीबाबत हितसंबंधाबाबतचा मुद्दा उपस्थित होत नाही. जर गांगुली आयपीएलच्या कुठल्या संघासोबत जुळलेला असता तर गोष्ट वेगळी असती. हितसंबंध गुंतल्याचा अर्थ बऱ्याच जणांना ठाऊक नाही. समजा मी एक वकील आहे आणि माझा एक क्लायंट आहे. क्लायंटचा जर भविष्यात कुठल्या प्रकारे बीसीसीआयसोबत संबंध आला तर हितसंबंधाचा मुद्दा कसा काय उपस्थित होईल. पदावर असताना भेदभाव करीत असेल तर हितसंबंधाचा मुद्दा उपस्थित होतो. हितसंबंध गुंतल्याच्या मुद्याचा आता विपर्यास करण्यात येत आहे. हे माझे वैयक्तिक मत आहे. आता बीसीसीआने एक स्वतंत्र लोकपालची (सेवानिवृत्त न्यायमूर्ती एपी शाह) नियुक्ती केलेली असून हितसंबंध गुंतल्याची शक्यता आहे का, याबाबत ते निर्णय घेतील. पोलिसांसोबत समन्वय साधण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे प्रमुख अजय शिर्के यांना त्यांची उपस्थिती हितसंबंध गुंतल्याचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी पुरेशी आहे का, असे विचारण्यात आले. याबाबत बोलताना शिर्के म्हणाले, ‘‘माझ्या मते नाही. हितसंबंध गुंतल्याचा मुद्दा कुठे उपस्थित होतो. (वृत्तसंस्था)‘भारत-पाक मालिकेचे भविष्य करायला मी ज्योतिषी नाही’भारत-पाक यांच्यात प्रस्तावित क्रिकेट मालिका कधीपर्यंत होईल, या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांनी मंगळवारी फार सावधपणे दिले. भारत सरकारने मालिकेत खेळण्याबाबतची अंतिम मंजुरी प्रदान केली नसल्याने मालिकेचे भविष्य सध्यातरी अधांतरी आहे. मालिकेचे आयोजन नेमके कधी होऊ शकते, असा प्रश्न मनोहर यांना विचारताच ते म्हणाले, ‘‘ही मालिका पाकने आयोजित करायची असल्याने आयोजन स्थळ, तिकीट व्यवस्था आणि प्रायोजकांबाबत निर्णय त्यांंनी घ्यायचा आहे. दौऱ्याबाबत सरकारची मंजुरी मिळेल, अशी शक्यता वाटते काय, असा प्रश्न करताच ते म्हणाले, ‘‘मी काही ज्योतिषी नाही. भारत-पाक मालिकेबाबत निश्चित भविष्य वर्तविणे माझे काम नाही. परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज या पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या विदेश प्रकरणाच्या सल्लागारांसमवेत चर्चेसाठी आजच इस्लामाबाद येथे रवाना झाल्या आहेत.’’