शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

खेळाला कारकिर्दीच्या दृष्टिने पाहणे सुरू झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 01:58 IST

खेलो इंडिया योजनेत हजारो युवा खेळाडूंना मदत होत आहे.

- अखिल कुमार लिहितात...खेलो इंडियाच्या माध्यमातून देशात क्रीडा संस्कृतीचा विकास होताना पाहात आहे. तरीही अगदी सुरुवातीच्या पातळीपासून क्रीडा संस्कृती विकसित होण्याची गरज आहे. २०१८ ला नवी दिल्लीत आयोजित झालेल्या खेलो इंडियाच्या आयोजनापासून भारतीय क्रीडाक्षेत्र प्रगती साधेल याची जाणीव झाली होती. २०१९ आणि २०२० च्या यूथ गेम्समधून अनेक प्रतिभा पुढे आल्या. आता खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंना उच्च दर्जाची चढाओढ अनुभवायला मिळत आहे.मी १९६४ ला बॉक्सिंग सुरू केले, तेव्हा कारकिर्द म्हणून खेळाकडे पाहिले जात नव्हते. २०२० मध्ये मात्र अनेकघरांमध्ये खेळाची चर्चा सुरु झाली. घराघरात लोक खेलो इंडिया गेम्सवर व या स्पर्धेतील आपल्या मुलांच्या कामगिरीवर चर्चा करतात. या माध्यमातून आलेली सकारात्मकता खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेपर्यंत पोहोचली. खेळातही कारकिर्द होऊ शकते, असा विचार आता लोक करुलागले. खेळ उपजीविकेचे साधनही बनू शकते. खेळावरील खर्चाची पालकांची चिंता आता खेलो इंडिया शिष्यवृत्तीमुळे कमी झाली.मी हरयाणा पोलीस दलात कार्यरत आहे. माझी नियुक्ती गुडगावला आहे. येथे मी दररोज वाहतुकीचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होताना पाहतो. अनेक सुशिक्षित लोक वाहन योग्यपद्धतीने पार्क करीत नाही. त्यांनी ड्रायव्हिंग शिकले, पण नियमांचे पालन नाही. नेमके हेच सूत्र खेळात लागू होते. खेळ शिकण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. खेलो इंडिया स्पर्धांमुळे युवा खेळाडूंची जडणघडण करण्यास आपण सक्षम होत आहोत.खेलो इंडिया योजनेत हजारो युवा खेळाडूंना मदत होत आहे. यामुळे भविष्यात देशाला आॅलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करणारे खेळाडू गवसतील. देशात समूृद्ध क्रीडा संस्कृती रुजविण्याची ही सुरुवात आहे. खेलो विद्यापीठ स्पर्धा क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ठरेल.(बॉक्सर अखिल कुमार आॅलिम्पिक खेळाडू असून एनआयएस प्रशिक्षक आहेत.)

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडिया