कोलकाता : केकेआरने सुपरकिंग्सविरुद्धचा आधीचा सामना दोन धावांनी गमविताच कर्णधार गौतम गंभीर अतिशय नाराज झाला होता. पण गुरुवारी याच संघाला सात गड्यांनी धूळ चारल्याने त्याला मोठा दिलासा लाभला. सुपरकिंग्सच्या १६६ धावांचा पाठलाग करणाऱ्या केकेआरने रॉबिन उथप्पाच्या नाबाद ८० तसेच आंदे्र रसेलच्या नाबाद ५५ धावांच्या बळावर एक चेंडू शिल्लक राखून सात गड्यांनी शानदार विजय साजरा केला. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद ११२ धावांची भागीदारी केली होती. सामन्यानंतर गंभीर म्हणाला,‘मागच्या सामन्यात विजयापासून दूर राहिल्यानंतर काल परीक्षा होती. चांगल्या कामगिरीचे शानदार प्रयत्न करीत आम्ही जिंकलो. गत चॅम्पियनसारखे खेळायचे असेल तर ही परीक्षा आहे असे मी सहकाऱ्यांना सांगितले होते. रसेलसोबत खेळताना भावनेच्या आहारी न जाता उथप्पाने मोठी संयमी कामगिरी बजावली. चेन्नईला आम्ही १४० ते १५० धावांत रोखू असे वाटले होते पण आऊटफिल्ड जलद असल्याने अखगरच्या टप्प्यात धावा गेल्या.’(वृत्तसंस्था)
सुपरकिंग्सवरील विजयामुळे गंभीरला दिलासा
By admin | Updated: May 2, 2015 10:20 IST