शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

गंभीर-तिवारी यांच्यात हमरीतुमरी!

By admin | Updated: October 25, 2015 04:09 IST

फिरोजशाह कोटला मैदानावर शनिवारी दिल्ली-बंगाल रणजी लढतीदरम्यान उभय संघांच्या कर्णधारांदरम्यान चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

नवी दिल्ली : फिरोजशाह कोटला मैदानावर शनिवारी दिल्ली-बंगाल रणजी लढतीदरम्यान उभय संघांच्या कर्णधारांदरम्यान चांगलीच शाब्दिक चकमक झाली. दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीर तसेच बंगालचा कर्णधार मनोज तिवारी हे हमरीतुमरीवर आले. एकमेकांना पाहून घेण्याची धमकी दोघांनीही दिली. पंचाने मध्यस्थी करताच त्यांनाही धक्का देण्यात आला. गंभीर आणि तिवारी परस्परांच्या अंगावर धावून आले तेव्हा पंच के. श्रीनाथ यांनी उभय खेळाडूंना समजविण्याचा व शांत करण्याचा प्रयत्न केला. गंभीरने पंचांनाही धक्का दिला. क्रिकेटमध्ये पंचांना धक्का देणे हा मोठा अपराध मानला जातो व बंदीची शिक्षादेखील होऊ शकते.ही घटना आठव्या षटकात घडली. पार्थसारथी भट्टाचार्य याला मनन शर्मा याने बाद करताच तिवारी चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला. त्याने ‘गार्ड’ घेतल्यानंतर फलंदाजी करण्याआधी गोलंदाजाला रोखले व पॅव्हेलियनकडे पाहात ड्रेसिंग रूममधून हेल्मेट आणण्याचा इशारा दिला. तिवारी हेतुपुरस्सरपणे ‘टाईमपास’ करीत असावा, असा दिल्लीच्या खेळाडूंचा समज झाला. मनन व तिवारी यांच्यात ‘तू-तू, मै-मै’ सुरू असताना पहिल्या स्लिपमध्ये उभा असलेला गंभीर तिवारीजवळ आला आणि त्याला शिविगाळ करू लागला. तिवारीनेदेखील गंभीरला त्याच्याच भाषेत उत्तर दिले. गंभीर म्हणाला, ‘सायंकाळी भेट तुला मारतोच!’ उत्तरात तिवारी म्हणाला, ‘सायंकाळी का, आताच बाहेर चल!’ गंभीर आणि तिवारी या दोघांना मॅच रेफ्री वाल्मिक बूच यांनी पाचारण केले आहे. (वृत्तसंस्था)