शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गंभीर-लिन जोडीने छाप सोडली

By admin | Updated: April 8, 2017 23:46 IST

कोलकाता संघाने गेल्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थान भूषविणाऱ्या गुजरात संघाचा १० गडी राखून पराभव करीत आयपीएलच्या दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने शानदार

- सुनील गावसकर लिहितात...कोलकाता संघाने गेल्या वर्षी गुणतालिकेत अव्वल स्थान भूषविणाऱ्या गुजरात संघाचा १० गडी राखून पराभव करीत आयपीएलच्या दहाव्या पर्वात जेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने शानदार सुरुवात केली. टी-२० क्रिकेटमध्ये एखाद्या संघाने १०० धावा फटकावताना विकेट न गमावणे, असे क्वचितच घडते आणि गंभीर-लिन जोडीने १८४ धावांचे मोठे लक्ष्य विकेट न गमविता पूर्ण केले. त्यामुळे लायन्सच्या कर्णधाराला अपल्या गोलंदाजांच्या क्षमतेवर शंका व्यक्त करण्यास बाध्य केले. रैनाने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या लढतीत फॉकनरचा अपवाद वगळता सर्व भारतीय गोलंदाजांचा संघात समावेश केला. आॅस्ट्रेलियन गोलंदाजाच्याउपस्थितीचा गंभीर-लिन जोडीच्या फलंदाजीवर काही प्रभाव पडला नसता, असे कर्णधाराला वाटू शकते. दरम्यान, अन्य फ्रे न्चायजीने वगळलेल्या खेळाडूंना करारबद्ध करणे जोखमीचे ठरू शकते. फ्रे न्चायजी पैसा वाचविण्यासाठी वगळण्यात आलेल्या खेळाडूंना करारबद्ध करतात. या अती झटपट क्रिकेट स्पर्धेत गंभीरची शैली पूर्णपणे वेगळी असते. त्याची पायांची हालचाल वेगळीच भासते. गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटताक्षणीच गंभीरने आपला निर्धार पक्का केलेला असतो. फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याची आक्रमकता पाहण्याजोगी असते. धावा पळताना त्याची चपळाई एखाद्या किशोरवयीन खेळाडूप्रमाणे असते. लिनने आक्रमक खेळी करताना आक्रमक फलंदाज म्हणून छाप सोडली आहे. राजकोटमध्ये त्याने आठ षटकार लगावले. कोलकाताची ही आक्रमक जोडी मुंबई संघासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. त्याचसोबत मुंबई संघाला पीयूष चावला व कुलदीप यादव यांच्याविरुद्धही सावधगिरी बाळगावी लागेल. चावलाच्या प्रत्येक सत्रातील कामगिरीचा आलेख उंचावणारा आहे. युवा कुलदीप निर्णायक क्षणी बळी घेण्यात यशस्वी ठरत आहे. मुंबई संघाला आपल्या गोलंदाजीवर लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: शेजारी पुणे संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या लढतीत मुंबई संघाची गोलंदाजी साधारण होती. हरभजनला वगळण्याचा निर्णय धाडसी होता, पण भज्जीला यानंतरच्या लढतीत आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून ते सिद्ध करावे लागेल. हरभजनसारख्या अनुभवी खेळाडूला केवळ प्रेम किंवा पैशासाठी विकत घेतले जात नाही. मुंबई संघाला त्याच्या लढवय्या खेळाची गरज आहे. सनरायजर्स संघाची सुरुवात चांगली झाली असून गुजरातविरुद्ध गतचॅम्पियन्स संघाचे पारडे वरचढ भासत आहे. दरम्यान, टी-२० मध्ये संघ व खेळाडूंच्या फॉर्मबाबत भाकीत वर्तविणे कठीण असते. कदाचित रैनाही हाच विचार करीत असेल.(पीएमजी)