शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

फ्रेंच ओपन : व्होज्नियाकीची कुज्नेत्सोव्हावर मात करत नदाल उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: June 5, 2017 03:56 IST

नऊवेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या राफेल नदालने विक्रमी ११ व्यांदा फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली

पॅरिस : नऊ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या राफेल नदालने विक्रमी ११ व्यांदा फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे, तर कॅरोलिन व्होज्नियाकीने २००९ ची चॅम्पियन स्वेतलाना कुज्नेत्सोव्हाचा पराभव करीत अंतिम आठ खेळाडूंत स्थान मिळवले.नदालने कामगिरीत सातत्य राखताना १७ व्या मानांकित स्पेनच्या रॉबर्टो बतिस्ता एगटचा ६-१, ६-२, ६-२ ने पराभव केला. या विजयासह नदालने ११ वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी साधली. १४ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणाऱ्या नदालने या स्पर्धेत अद्याप एकही सेट गमावलेला नाही. गेल्या दोन लढतींमध्ये त्याने केवळ सहा गेम गमावले आहेत. गत चॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचने स्पेनच्या अलबर्ट रामोस विनोलसचा पराभव केला, तर तो ११ व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरेल. जपानच्या केई निशिकोरीने दक्षिण कोरियाच्या हियोन चुंगचा ७-५, ६-४, ६-७, ०-६, ६-४ ने पराभव केला. आता त्याला फर्नांडो वर्डास्कोच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. महिला विभागात ११ व्या मानांकित डेन्मार्कच्या व्होज्नियाकीने कुज्नेत्सोव्हाचा ६-१, ४-६, ६-२ ने पराभव केला. आॅस्ट्रेलियाची सामंथा स्टोसूर लाटवियाच्या येलेना ओसोबत खेळणार आहे. दुसऱ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाने जर्मनीच्या कारिना विथोप्टचा ७-५, ६-१ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)