शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच ओपनमध्ये उलथापालथ! गतविजेत्या जोकोव्हिचचे आव्हान संपुष्टात

By admin | Updated: June 7, 2017 17:46 IST

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत आज जबरदस्त उलथापालथीची नोंद झाली. ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम याने यंदाच्या स्पर्धेतील सर्वात

ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 7 - फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत आज जबरदस्त उलथापालथीची नोंद झाली. ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम याने यंदाच्या स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकालाची नोंद करताना गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हाण संपुष्टात आणले.  आज झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत थिमच्या खेळासमोर जोकोव्हिचची मात्रा चालली नाही आणि अखेर या लढतीत थिमने 7-6(7-5), 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.  आता उपांत्य फेरीत डॉमिनिकची गाठ क्ले कोर्टचा बादशहा राफाएल नदाल याच्याशी होणार आहे.
 
एकतर्फी झालेल्या या लढतीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमने सुरुवातीपासूनच जोकोव्हिचवर वर्चस्व गाजवले. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूममध्ये थोडी चुरस पाहायला मिळाली. पण टायब्रेकरपर्यंत गेलेल्या या सेटमध्ये 7-6(7-5) अशी बाजी मारत डॉमिनिकने लढतीत आघाडी मिळवली. 
 
त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये आपला खेळ अधिक उंचावत डॉमिनिकने हा सेट 6-3 ने जिंकला. पहिले दोन सेट गमावल्यावर पुरत्या दमलेल्या जोकोव्हिचला डॉमिनिकने तिसऱ्या सेटमध्ये अजिबात वरचढ होऊ दिले नाही. अखेर या सेटमध्ये जोकोव्हिचचा 6-0 ने धुव्वा उडवत डॉमिनिकने सामना 7-6(7-5), 6-3, 6-0 असा सरळ सेटमध्ये जिंकला.