शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

फ्रेंच ओपन बॅडमिंटन : सात्विक-चिराग जोडी अंतिम फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2019 01:27 IST

जेतेपदासाठी इंडोनेशियन जोडीविरुद्ध भिडणार

पॅरिस : भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडी आपली शानदार कामगिरी कायम राखत फ्रेंच ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने जपानच्या हिरोयुकी एंडो व युता वाटाम्बे या जोडीचा पराभव केला.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद विजेत्या सात्विक साईराज व चिराग शेट्टी या जोडीने अटीतटीच्या सामन्यात एंडो व वाटाम्बे या जोडीला २१-११, २५-२३ असे पराभूत केले. जपानच्या या जोडीकडून भारतीय जोडीला यापुर्वीच्या दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

जागतिक विजेती व ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू, तसेच आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल यांच्या पराभवानंतर सात्विक व चिराग यांच्या रुपात या स्पर्धेत भारताचे एकमेव आव्हान टिकले आहे. अंतिम सामन्यात भारतीय जोडीला इंडोनेशियाच्या मार्कस गायडोन व केविन सुकामुजो यांच्याशी दोन हात करावे लागेल. दरम्यान भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय बॅडमिंटन संघटनेने या जोडीला शुभेच्छा दिल्या आहेत. आणखी एका जेतेपदाची उत्सुकतायाआधी सात्विक आणि चिराग यांनी ऑगस्ट महिन्यात सर्व भारतीयांना विजयी भेट देताना थायलंड ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात विजेतेपद उंचावले होते. यावेळी मात्र दोघांनी ऐतिहासिक कामगिरी केली. वर्ल्ड टूर ७५० स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारे सात्विक-चिराग पहिली भारतीय जोडी ठरली.

टॅग्स :BadmintonBadminton