शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि मल्ल प्रवीण राणा यांच्या समर्थकांमध्ये कुस्ती रिंगणाबाहेर तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 09:54 IST

नवी दिल्ली : दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार हा आगामी राष्ट्रकुल स्पर्धा कुस्तीसाठी पात्र ठरला खरा, मात्र त्याच्या तसेच पारंपरिक प्रतिस्पर्धी मल्ल प्रवीण राणा समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने या निवडीला वादाचे गालबोट लागले.

नवी दिल्ली : दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार हा आगामी राष्ट्रकुल स्पर्धा कुस्तीसाठी पात्र ठरला खरा, मात्र त्याच्या तसेच पारंपरिक प्रतिस्पर्धी मल्ल प्रवीण राणा समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने या निवडीला वादाचे गालबोट लागले.गोल्डकोस्ट राष्ट्रकुलसाठी शुक्रवारी इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियममध्ये निवड चाचणी रंगली होती. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषणसिंग यावेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये पुनरागमन करणा-या सुशीलने स्वत:चे तिन्ही सामने जिंकले. पण उपांत्य लढतीत सुशीलकडून पराभूत होताच राणाने, सुशीलविरुद्ध खेळू नये यासाठी प्रतिस्पर्धी समर्थकांनी मला व माझ्या भावाला मारल्याचा दावा केला, शिवाय आगामी प्रो लीगमध्येही खेळण्याची चूक करू नकोस, अशी धमकी मिळाल्याचा आरोप केला.दुसरीकडे सुशीलने लढतीदरम्यान राणाने मारल्याचा आरोप केला. सुशील म्हणाला, ‘राणाने मला मारले पण मला रोखण्याचे त्याचे डावपेच असावेत. खेळाचा हा भाग असावा. याचा मी निषेध करतो. जे झाले ते चुकीचे होते पण मैदानाबाहेर आम्ही एकमेकांचा सन्मान करतो’.अध्यक्ष बृजभूषण यांनी कानावर हात ठेवत म्हटले, ‘हे प्रकरण रिंगणाबाहेरचे आहे. मी ते पाहिलेले नाही. आम्ही दिल्ली पोलिसांकडे सुरक्षा मागितली होती, पण ती मिळाली नाही. वर्षभरापासून आम्हाला ही शंका होती. औपचारिक तक्रार मिळताच कारवाई होईल.’>सुशील राष्ट्रकुलसाठी पात्रसुशीलकुमार आणि पाच अन्य पुरुष पहिलवानांनी पुढील वर्षी गोल्ड कोस्टमध्ये होणाºया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी आज क्वालिफाय केले आहे़ सुशील (७४ किलो) व्यतिरिक्त फ्री स्टाईलच्या अन्य पहिलवानांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी क्वालिफाय केले आहे़ यामध्ये राहुल आवारे (५७ किलो), बजरंग (६५ किलो), सोमवीर (८६ किलो), मौसम खत्री (९७ किलो) आणि सुमीत (१२५ किलो) यांचा समावेश आहे़

याआधी इंदूर येथे झालेल्या राष्ट्री़य कुस्ती स्पर्धेतही सुशील व प्रवीण आमनेसामने आले होते. मात्र, त्यावेळी प्रवीणने विरोध दर्शवताना सुशील कुमारला वॉकओव्हर दिला होता. या स्पर्धेत सुशीलने बाद फेरी न खेळताच सुवर्ण जिंकले होते.