शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजी विश्वविजेत्या चेकाचे विजेंदरला चॅलेंज

By admin | Updated: November 15, 2016 01:12 IST

सलग ७ विजयांसह आपल्या व्यावसायिक बॉक्सिंगची धडाक्यात सुरुवात करणारा भारताचा स्टार खेळाडू विजेंदरला आता तगडे आव्हान मिळाले आहे.

नवी दिल्ली : सलग ७ विजयांसह आपल्या व्यावसायिक बॉक्सिंगची धडाक्यात सुरुवात करणारा भारताचा स्टार खेळाडू विजेंदरला आता तगडे आव्हान मिळाले आहे. माजी विश्वविजेता असलेल्या फ्रान्सिस चेकाने दिलेल्या चॅलेंजमुळे आता विजेंदरला काही महिन्यापूर्वीच पटकावलेल्या सुपर मिडलवेट आशिया - पॅसिफिक किताबाचा बचाव करायचा आहे. येत्या १७ डिसेंबरला दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये होणाऱ्या या लढतीसाठी विजेंदरने कंबर कसली आहे.विद्यमान आंतरमहाद्वीप चॅम्पियन असलेल्या टांझानियाच्या चेकाकडे ४३ सामन्यांच्या अनुभव असून त्याने १७ नॉकआऊटसह ३२ विजय मिळवले आहेत. त्याच्याकडे सुपर मिडलवेट गटातील दिग्गजांविरुद्ध लढण्याचा अनुभव आहे. तसेच चेकाने आपल्या १६ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये ३०० राऊंडच्या लढती लढल्या आहेत.तर, आतापर्यंत अपराजित असलेल्या विजेंदरने सलग ७ लढती जिंकताना संपूर्ण बॉक्सिंग विश्वाचे लक्ष वेधले आहे. तसेच विजेंदरकडे केवळ २७ राऊंडच्या लढतींचा अनुभव आहे. मात्र तरीही, ज्या प्रकारे त्याने आतापर्यंत आपली चमक दाखवली आहे, त्याकडे पाहता बॉक्सिंगप्रेमींना ही लढत एकतर्फी नक्कीच होणार नसल्याची पुरेपूर खात्री आहे.चेकाने विजेंदरला आव्हान देताना म्हटले आहे, की ‘मी या मुलाबद्दल खूप काही ऐकले आहे. त्याला बॉक्सिंगचे धडे द्यायला मी सज्ज आहे. मी भारतात येणार आहे. मी त्याला त्याच्याच घरामध्ये नमवण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. त्याला त्याच्या घरीच नमवून किताब पटकावणे शानदार ठरेल.’ (वृत्तसंस्था)